आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांना दिली होती नोकरांनी "टिप्स'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ज्या गुंडांनी हल्ला चढवून रक्कम लंपास केली होती, त्यांना काही दिवसांपूर्वीच दुकानातीलच नोकरांनी लुटण्याच्या टिप्स दिल्याचे समोर आले आहे. व्यापारीबंधू गुरुबाणी लूट प्रकरणी पोलिसांनी शिवसेना वसाहत येथील तिघांना ताब्यात घेतले आहे.
धर्मेश गुरुबानी हे त्यांच्या दुकानातून ११ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या भावासोबत घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना दुकानात किती रुपयांची दररोज उलाढाल होते आणि संध्याकाळी त्या पैशाची कशा प्रकारे विल्हेवाट लावल्या जाते, याची इत्थंभूत माहिती दुकानात काम करणाऱ्या नोकरांकडून आरोपींना मिळाली होती.
आता या नोकरांनी नोकरी सोडली असून, स्वत:चे वाहन विकत घेतले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींनी त्यांना माहिती देणाऱ्याचे नाव सांगितल्यानंतर पोलिस शनिवारी सकाळी शिवसेना वसाहतमध्ये गेले. तेथून त्यांनी माहिती देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर या दोघांनी आणखी एका जणाचे नाव सांगितल्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांनी आपण सहज बोललो होतो, अशी कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोट्या राऊत, अनुप देशमुख, अमित काळे हे तिघे आरोपी रविवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. त्यांची पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.