आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छळ करणाऱ्या पतीला सक्तमजुरी; साक्षीनंतर पत्नीचा झाला हाेता खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- पत्नीचा मानसिक शारीरिक छळ करणाऱ्या पतीला शुक्रवारी न्यायालयाने महिने सक्तमुजरीची शिक्षा ठाेठावली. बलराम उर्फ कृपाल मंगलदास बलवानी (रा. सिंधी कॅम्प), असे अाराेपीचे नाव अाहे. पत्नीने साक्ष दिल्यानंतर काही दिवसांनी तिचा खून झाला, हे येथे उल्लेखनीय.

संधी कॅम्प परिसरात राहणाऱ्या कौसल्या उर्फ भारती बलराम बलवानी यांनी १३ डिसेंबर २०१२ राेजी खदान पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. पती बलराम बलवानी हा मारहाण करत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले हाेते. ३० नाव्हेंबर राेजी तर पतीने पाइप फायटरने मारहाण केली हाेती. या तक्रारीवरून पोलिसांनी बलराम बलवानी विरुद्ध भादंविचे कलम ४९८(छळ करणे), ५०६ (धमकी) गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी तपास करून दाेषाराेप पत्रही न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी माेहिनी ननवरे यांच्या न्यायालयात झाली. दाेन्ही बाजूच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांनी नाेंदवलेली साक्ष उपलब्ध पुराव्यांच्या अाधारे न्यायालयाने अाराेपींना भादंविचे कलम ४९८ अन्वये महिने सक्तमजुरी हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली. दंड भरल्यास एक महिना कारावास भाेगावा लागणार अाहे. तसेच भादंविचे कलम ५०६ अन्वये महिना कारावासाची शिक्षा ठाेठावण्यात अाली अाहे. सरकारतर्फे सरकारी वकिल राजेश अाकाेटकर यांनी काम पाहिले. अॅड. अाकाेटकर यांनी जुलै अाॅगस्टपर्यंत केलेला युक्तिवाद एेकूण तीन खटल्यामध्ये शिक्षा ठाेठावली अाहे.

पत्नीच्याखुनात पती संशयित अाराेपी : कौसल्याबलवानी यांच्या छळाच्या खटल्यात सरकारतर्फे एकूण साक्षीदार तपासण्यात अाले. यामध्ये कौसल्या तिच्या मुलीचीही साक्ष नाेंदवण्यात अाली. या दाेन्ही साक्षी निकालात महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर २०१४मध्ये कैसल्या बलवानी यांचा खून झाला. पतीपासून जीवाला धाेका असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले हाेते. खूनात पती बलराम बलवानी हा संशयित अाराेपी असल्याचे पोलिसांनी सांगितले हाेते.

पहिलीचे निधन, दुसरीने साेडले, चौथीशी संबंध
अाराेपीबलराम बलवानीविराेधात पत्नीने पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. पती बलरामच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले हाेते. दुसरी पत्नी त्याला साेडून गेली हाेती. चौथ्या एका स्त्रीशी अनैतिक संबंध हाेते, असे तिने तक्रारीत नमूद केले हाेते. तिसरी पत्नी ही काैसल्या हाेती.
बातम्या आणखी आहेत...