आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७० % घरातील टीव्ही बंद, नागरी भागात लागले केवळ हजार २६३ सेट टॉप बॉक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अाता केबल प्रक्षेपण सेट टॉप बॉक्सद्वारेच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. याचा फटका शहरातील ७० टक्के केबल सेवा घेणाऱ्या ग्राहकांना बसला अाहे. सेट टाॅप बाॅक्स लावल्याशिवाय केबल दिसणार नसल्यामुळे अाता अनेक ग्राहकांना टीव्हीवरील कार्यक्रमांपासून वंचित राहावे लागत अाहे. अाता सेट टाॅप बाॅक्सची मागणी वाढल्यामुळे जास्तीचे पैसे घेतले जात अाहे.
३१ डिसेंबरपूर्वी सेट टाॅप बाॅक्स लावण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या करमणूक विभागातर्फे गेल्या सहा महिन्यांपासून केल्या जात आहे. मात्र, या सूचनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच अनेकांच्या घरांमधील टीव्हीचा अावाज बंद झाला. केबलधारकांनासुद्धा सेट टॉप बॉक्स लावण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीसुद्धा सेट टॉप बॉक्स लावता आदेशाकडे दुर्लक्ष करून गैरकायदेशीरपणे केबल दाखवण्यात येत हाेते. वेळेत केबलधारकांनी जर सेट टॉप बॉक्स लावून दिले असते, तर टीव्ही बंद पडले नसते. २८ डिसेंबरपर्यंत हजार ३३५ केबलधारकांकडे सेट टॉप बॉक्स लावले होते, जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील नागरी भागात हजार २९८ सेट टॉप बॉक्स लावले अाहे.

निश्चित दरातच विक्री करा
^ठरवून दिलेल्या निश्चित दरातच सेट टॉप बॉक्स विक्री करावा. जादा दराने विक्री केल्याप्रकरणी तक्रार आल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल.'' जी. जी. गिरी, सहायकजिल्हा करमणूक कर अधिकारी

काही ठिकाणी अनधिकृत प्रक्षेपण
शहरातील काही भागांत अनाधिकृतरीत्या प्रक्षेपण सुरू अाहे. प्रशासनाकडून अशांचा शोध घेण्यात दिरंगाई केली जात आहे. जिल्हा करमणूक कर अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करणे अपेक्षित आहे.
अशी आहे सध्याची स्थिती
अकोला - ७७१८
अकोट - ११५
बाळापूर - १००
मुर्तिजापूर - १२००
तेल्हारा - १३०
एकुण - ९,२६३