आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषण : पीडिताला दिली जीवे मारण्याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
अकोला- भारतीयसेवा सदनचे माजी पदाधिकारी निरंजन गोयनका जुगलकिशोर रुंगटा यांंच्यावरील आरोप मागे घे, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत लैंगिक शोषण प्रकरणातील फिर्यादी युवकाला काही युवकांनी दुपारी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. आरोपींना बुधवारी रात्रीपर्यंत अटक करण्यात आली नसून, त्यांनी जामीन घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून गाेयनका रुंगटा या दोघांनी डाबकीतील रहिवासी युवकाचे गेल्या आठ वर्षांपासून लैंगिक शोषण केले. त्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात या युवकाने प्रसिद्धिमाध्यमांसमोर आपबिती मांडली. तेव्हा शिक्षण क्षेत्रातील हा घृणास्पद प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी गोयनका रुंगटा यांच्याविरुद्ध कलम ३७७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी सायंकाळी पीडित युवकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

घटनास्थळीतपासणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना महाविद्यालय प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नाही. आमच्याकडे किल्ली नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी अखेर कुलूप तोडले. खोलीतील काही साहित्य पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
युवकाचा जीव धोक्यात
पीडित युवकाला दुपारच्या सुमारास काही युवकांनी रस्त्यात थांबवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याने अनोळखी युवकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपला जीव धोक्यात असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले.

आरोपींची न्यायालयात धाव
आरोपीिनरंजन गोयनका जुगलकिशोर रुंगटा यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. १५ जुलैपर्यंत त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. अधिक तपास सिव्हिल लाइन पोलिस करत आहेत.

साक्षीदारांचे बयाण नोंदवले
याप्रकरणीमाजी मुख्याध्यापक साक्षीदारांचे बयाण नोंदवण्यात आले आहे. पोलिसांना घटनेबाबत अधिक माहिती हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, माहिती गोपनीय असल्याने ती सध्या उघड करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.