आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषण; गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीचे लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिल्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून अकोट ग्रामीण पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अकोलखेड येथील सुधीर ओमप्रकाश खैरे (वय २२) याने गावातीलच एका १८ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र लग्नास नकार दिला. यामुळे पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सुधीर खैरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार शेळके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय जी. बी. देशमुख करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...