आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील या ट्रेनवर आहे आजही इंग्रजांची मालकी, 70 वर्षानंतर होणार स्‍वातंत्र्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मूर्तीजापूर - यवतमाळ या नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या 'शकुंतले'साठी रेल्वे मंत्रालयाने 1500 कोटी रुपयांच्या ब्रॉडगेज प्रस्तावास मान्यता दिली. विशेष म्‍हणजे आजही ही गाडी इंग्रजांच्‍या ताब्‍यात आहे. देश स्‍वातंत्र्यांच्‍या 70 वर्षानंतर ती स्‍वातंत्र्य होणार आहे. त्‍या अनुषंगाने divyamrathi.com सांगणार आहोत 'शंकुतले'चा प्रवास...
इंग्रजांनी का सुरू केली शकुंतला ?
व-हाडात कापसाला पांढरे सोने म्हटले जायचे. हे सोने लुटण्यासाठी ब्रिटिशांनी मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ हा लोहमार्ग टाकून एक मालगाडी सुरू केली. पुढे तिला प्रवासी गाडी केली. तिला प्रवाशांनी ‘शकुंतला’ नाव दिले. या गाडीला पाचच डब्‍बे आहेत. इंग्‍लडमधील ‘क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनी’ या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी 15 स्टेशन आहेत. ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च तेव्हढी होती.

या रेल्‍वेवर अजूनही आहे इंग्रजांनी मालकी

क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी असे झाले होते) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील 100 वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला होता. ओघानानेच स्‍वातंत्र्यानंतर भारत सरकारला तो पाळावा लागला. त्यामुळे वर्ष 2003 पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. पण, पुढेही भारत सरकारने या कंपनीला या करार वाढवून दिला. त्यामुळे स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे त्या कंपनीला दरवर्षी 1 कोटी 20 रुपये रॉयल्टीची रक्कम देते.


पुढील स्‍लाइडवर वाचा, हात दाखवा गाडी थांबवा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)