आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shakuntala Railway : A Historic Train Faces An Uncertain Future

विदर्भातील या ट्रेनवर आहे आजही इंग्रजांची मालकी, हात दाखवला की थांबते गाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा येथील रेल्‍वे स्‍थानकावर थांबलेली शकुंतला. - Divya Marathi
कारंजा येथील रेल्‍वे स्‍थानकावर थांबलेली शकुंतला.
अकोला - 25 फेब्रुवारीला संसदेत रेल्‍वे बजेट सादर होणार आहे. त्‍यावर सत्‍ताधारी आणि विरोध यांच्‍याकडून साधक-बाधक चर्चाही होईल. मात्र, रेल्‍वेचे काही असे प्रश्‍न आहेत की, जे देश स्‍वातंत्र्यापासूनच प्रलंबित आहेत. त्‍यापैकीच एक प्रश्‍न म्‍हणजे मूर्तीजापूर ते यवतमाळ या ब्रॉडगेज मार्गावरून धावणाऱ्या शकुंतला रेल्‍वेचा. अकोला, वाशीम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना जोडणारी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजवर धावावी, अशी संपूर्ण वऱ्हाडवासियांची अपेक्षा आहे. मात्र, देश स्‍वातंत्र्यानंतरही या रेल्‍वेवर अजूनही इंग्रजांचीच मालकी असून, शकुंतलेला भारतीय रेल्वे कंत्राटी पद्धतीने चालवत आहे. पण, त्‍याकडे लोकप्रतिनिधी, भारतीय रेल्‍वे यांचे दुर्लक्ष होत आले आहे. त्‍या अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहोत 'शंकुतले'चा प्रवास...
इंग्रजांनी का सुरू केली शकुंतला ?
व-हाडात कापसाला पांढरे सोने म्हटले जायचे. हे सोने लुटण्यासाठी ब्रिटिशांनी मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ हा लोहमार्ग टाकून एक मालगाडी सुरू केली. पुढे तिला प्रवासी गाडी केली. तिला प्रवाशांनी ‘शकुंतला’ नाव दिले. या गाडीला पाचच डब्‍बे आहेत. इंग्‍लडमधील ‘क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनी’ या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोंगठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, तपोना, लाडखेड, लिंगा, लासीना अशी 15 स्टेशन आहेत. ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च तेव्हढी होती.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, या रेल्‍वेवर अजूनही आहे इंग्रजांनी मालकी
छाया : फिरोज शेकुवाले, कारंजा लाड