आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला शेगावात लाखांवर भाविक; अाज गाेपाळ काला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव- सनई-चौघडा,टाळमृदंगाचा गजर, फुलांची उधळण, सुमारे एक लाखांवर भक्तांच्या मुखातून निघणारा ‘गण गण गणात बोते’चा जयघाेष अशा भारावलेल्या वातावरणात मंगळवारी संतनगरी तल्लीन झाली होती. श्री गजानन महाराजांच्या १०६ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्त हजारो दिंड्यांसह लाखो भाविक शेगावनगरीत दाखल झाले होते.

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शेगाव संस्थानमध्ये पहाटे ते काकडा,सकाळी ७.१५ ते ९.१५ वाजता भजन, दुपारी ते प्रवचन, रात्री ८ते १० वाजेपर्यंत किर्तन अादी कार्यक्रम पार पडले. दाेन सप्टेंबर राेजी संस्थानचे व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे उपस्थितीत ब्रह्मवृंदांच्या मंत्राेच्चारात श्री गणेशयागास वरुणयागास प्रारंभ झाला हाेता. मंगळवारी सकाळी १० वाजता या दाेन्ही याेगाची सांगता झाली. या वेळी पाटील यांच्या हस्ते पूर्णाहूती देण्यात अाली. यावेळी माेठ्या संख्येने भाविक उपस्थित हाेते. दुपारी दाेन वाजता श्रींच्या रजत मुखाची विधिवत पूजा होऊन पालखीत विराजमान करण्यात आले. श्रींचा पालखीची रथ, मेणा गज अश्वासह नगरपरिक्रमा काढण्यात आली. फेरी पूर्ण झाल्यानंतर श्रींच्या पालखीची शिवशंकरभाऊ यांच्या हस्ते महाआरती करून पालखी उत्सवाची सांगता करण्यात आली.

बुधवारी जगन्नाथबुवा म्हस्के, मुंबई यांचे सकाळी ते काल्याचे कीर्तन होईल. नंतर दहीहंडी, गोपाळकाला उत्सव होईल. नंतर पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल. पुण्यतिथी साेहळ्यात मंगळवारी संत श्री गजानन महाराजांचा रजत मुखवटा पालखीत ठेवून शेगावात नगर प्रदशिक्षण करण्यात अाली.

चाेख पोलिस बंदोबस्त
गेल्या दाेन दिवसांपासून या साेहळ्यास उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात अाली हाेती. तसेच चाेख पाेलिस बंदाेबस्तही तैनात करण्यात अाला हाेता. तीन ठाणेदार, ११ पोलीस उपनिरीक्षक, १०५ पोलिस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, एक दंगाकाबू पथकासह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मंदिर शहरात तैनात करण्यात अाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...