आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशक फवारणीतील बळीच्या चाैकशीची मागणी, जिल्हाधिकारी निवासस्थानापुढे ‘काळी’ दिवाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - शेतकऱ्यांना  सोयाबीन बोनसचे  ७ कोटी रुपये अदा करावे,  कीटकनाशक फवारणीच्या बळींची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात यावी, संपूर्ण कर्जमुक्ती अादी मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी निवासस्थासमाेर  प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी केली. कार्यकर्त्यांनी  काळे कंदील, काळे कपडे परिधान करीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा  निषेध केला. एकीकडे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढाणाऱ्या शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांना पोलिस बळाचा वापर करुन ताब्यात घेत होते तर दुसरीकडे जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यात व बाहेर पोलिसांना मिठाई दिली जात होती.  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात अाणले. तेथे दिवसभर  कार्यकर्त्यांना ताब्यात ठेवून संध्याकाळी साेडून दिले. 
 
या अांदाेलनात शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, मनाेज तायडे, जगदीश मुरुमकार, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर सुलताने, दिलीप माेहाेड, रवी पाटील अरबट, माे. वासिफ, शेख अन्सार, शिवाजी म्हैसने, महादेवराव भुईभार,  गजानन वारकरी, गाेपाल अाखरे, राजेश गवई, सुरेश अमानकर, दीपक गावंडे, रंगराव टेके, दिलीप दिवनाले, कृष्णा देशमुख, अमाेल ठाकरे, नीलेश चतरकर, संदीप लहाळे, केदार बकाल, वसंतराव उजाळे, लायकअली काजी, अलिम मिर्झा, विनाेद इंगळे, पप्पू मांगटे, दीवाकर देशमुख, किरण बाेपटे,  विलास ताथाेड, शेख साबीर शेख मुसा,  दर्पण खंडेलवाल, श्रीकांत पिसे, काशिराम साबळे, शैलेष  बाेदडे अादी सहभागी झाले हाेते.  

पोलिसांकडून अांदाेलन दडपण्याचा प्रयत्न : पोलिसांकडून शेतकरी जागर मंचाचे अांदाेलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा अाराेप कार्यकर्त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमाेर शहर  पोलिस उपअधीक्षक उमेश माने, रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, वाहतूक शाखेचे विलास पाटील, सिटी काेतवालीचे अनिल जुमळे, सिव्हील लाईन्सचे शेख अन्वर  या ठाणेदारांसह ४० पाेलिस  तैनात होते.

गनिमी कावा आला कामी 
पोलिसांनी अांदाेलनाच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थाकडे जाणाऱ्या मार्गांवर बंदाेबस्त तैनात केला हाेता. जेणेकरुन अांदाेलकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थापर्यंत पाेहाेचण्यापूर्वीच ताब्यात घेता येईल.  पोलिसांनी विशेषत: न्यू. राधाकिसन प्लाॅटकडून जिल्हाधिकारी निवासस्थाकडे जाणाऱ्या गल्लीत बंदाेबस्त तैनात केला हाेता. कुठेही अांदाेलक दिसल्यास त्याला बळाचा वापर करुन पकला, अशा सूचनाच पाेलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना देत हाेते. मात्र अांदाेलन नसात भिनलेल्या शेतकरी नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानासमाेर धाव घेत घाेषणाबाजी केलीच. अांदाेलक सिव्हील लाईन्स चाैकमार्गाने अांदाेलन स्थळी दाखल हाेत हाेते, हे येथे उल्लेखनीय.
बातम्या आणखी आहेत...