आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष बांधणीसाठी शिवसेनेचा ‘अॅक्शन प्लान’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अागामी मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेने पक्ष बांधणीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, विविध प्रभागांमध्ये ८० शाखांप्रमुखांसह उपविभाग प्रमुखांचे जाळे विणण्यात येणार अाहे. यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार अाहे. पक्ष बांधणीचा अॅक्शन प्लान संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थित तयार करण्यात अाला अाहे.

महापािलका, राज्य केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्तेत शिवसेना सहभागी अाहे. मात्र भाजप-शिवसेना एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेप करण्याची एकही संधी साेडत नाही. येणाऱ्या काळात शिवसेना लहान भावाच्या भूिमकेत राहण्याच्या मानसिकेत नाही. त्यामुळे जिल्हयात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयश्री खेचून अाणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली अाहे. सध्या शिवसेनेने सदस्य नाेंदणी अभियान सुरु केले अाहे. अकाेला शहरातही विविध ठिकाणी नाेंदणी करण्यात येत अाहे. यावर्षीच्या शेवटी नगर पािलका अाणि पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात महापािलका निवडणुका हाेणार अाहे. दरम्यान, रविवारी संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी झाेननिहाय शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर रात्री काही निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. त्यानुसार प्रथम शहरात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करण्यात येणार अाहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना सावंत यांनी दिल्या.

अशी हाेईल बांधणी
मनपाप्रभाग संख्या लक्षात घेऊन पक्ष बांधणीचे नियाेजन करण्यात अाले अाहे. एका प्रभागात चार नगरसेवक निवडणूक रिंगणात उतरणार असून, त्यानुसार २० प्रभागांमध्ये ८० शाखांप्रमुखांची नेमणूक करण्यात येणार अाहे. तसेच प्रत्येक ठिकाणी उपविभाग प्रमुख, बुथ प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात येणार अाहे.

तगडे अाव्हान : गत विधानसभा निवडणूक शिवसेना - भाजपने स्वतंत्रपणे लढविली. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी अकाेला पूर्व पश्चिम, अाकाेट मूिर्तजापूर या चार मतदारसंघांवर भाजपने झेंडा फडकावला. अकाेला शहराचा अर्थात महापालिका राजकारणाचा विचार केल्यास यावर भाजपची मजबूत पकड असल्याचे दिसते.अकाेला पूर्व पश्चिम मतदारसंघाचे दाेन्ही अामदार , पालकमंत्री , खासदार, महापाैर भाजपचे अाहेत. त्यामुळे महापािलका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दिशेने पक्ष बांधणी करणे शिवसेना पदाधिकाऱ्यांना प्रचंड परिश्रम करावे लागणार अाहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे अाहे.

नेतृत्व बदलावर चर्चा ?
सूत्रांनीिदलेल्या माहितीनुसार संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी रविवारी दिवसभर विशेषत: रात्री काही निवडक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महानगरासह इतरही जिल्ह्यातील इतरही ठिकाणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबाबत चर्चा झाली. नेतृत्व बदलाबाबत काही पदाधिकाऱ्यांनी अापले मतही मांडले. काहींनी ‘तरूणां’ना अाणखी संधी देण्याची वकालतही केल्याचे समजते. अर्थात पक्ष बांधणीसाठी तयार केलेल्या समितीच्या अहवालानंतर पुढील दिशा निश्चित हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...