आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रश्नांची उत्तरे: कर्जमुक्तीवरुन भाजपला काेंडीत पकडण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- शेतीशी निगडीत प्रश्नांवरुन जिल्ह्यात भाजप शिवसेना एकमेकांवर कुरघाेडी करणार अाहेत. शिवसेना शेतकऱ्यांमध्ये जाऊन सर्वेच्या माध्यमातून भाजपची काेंडी करणार असून सेनेने शेतीशी निगडीत १२ मुद्यांच्या अाधारे प्रश्नावली तयार केली केली अाहे. या प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडूनच भरुन घेण्यात येणार असून, जिल्हयात जिल्हा परिषद सर्कल विधानसभा निहाय सर्वे हाेणार अाहे. याच अाठवड्यात भाजप संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार अाहे. त्यामुळे यानिमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाणार अाहे.
 
शेतकरी कर्जमुक्तीवरुन शिवसेना केंद्र, राज्य सरकारला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाही. याच मुद्यावरुन शिवसेनेने राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अाक्रमक पवित्रा घेतला हाेता. परिणामी सभागृहाचे कामकाज प्रभावित झाले हाेते. काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने जिल्हयात रुमणे अांदाेलनाला प्रारंभ केला. पहिला माेर्चा बाळापूर येथे मे राेजी काढण्यात अाला. त्यानंतरच लवकरच अाकाेट, मूर्तिाजूर सर्वात शेवटी अकाेल्यात माेर्चा काढण्यात येणार अाहे. 

कर्जमुक्तीच्या मुद्यावरुन १५ मे राेजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकाेल्यात शेतकऱ्यांची संवाद साधला हाेता. त्याच वेळी त्यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांशी पक्ष संघटन बांधणीसाठी चर्चा केली हाेती. दरम्यान, अाता शिवसेनेने शेतीशी निगडीत प्रश्नांवरुन प्रश्नावली तयार केली असून या प्रश्नांची उत्तरे थेट शेतकऱ्यांकडून घेण्यात येणार अाहे. 

स्वबळावरची पेरण...
शिवसेनागत काही महिन्यांपासून अांदाेलनासह इतरही अायुधांचा वापर करुन अागामी निवडणुकी स्वबळावर कशा लढात येतील, या दृष्टीकाेनातून प्रयत्न करीत अाहे. मात्र भाजपची वाढती राजकीय ताकद लक्षात घेता निवडणुका जिंकणे शिवसेनेला साेपे नाही. शिवसेनेच्या तुलनेने भाजपला कमी परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे विधानसभा निवडणुकीत दाेन्ही पक्षांना मिळालेल्या अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.
 
देवेंद्रभाऊ मी कर्जमुक्त हाेणारच... 
शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘मी कर्जमुक्त हाेणारच’ या मथळ्याखाली पत्र लिहणार अाहे. पत्राची सुरुवातच ‘देवेंद्र भाऊ’, अशी हाेणार अाहे. हे पत्र शिवसेना कार्यालयात जमा करण्यात येणार असून, त्यानंतर पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार अाहेत. यापत्रात शेतीशी निगडीत प्रश्न तडीस नेणे कर्जमुक्ती याचा उहापाेह करण्यात येणार अाहे. 

पत्रात शेतकऱ्याचे नाव, त्याच्या कुटुंबातील सदस्य संख्या, शेतजमीन किती अाहे, घेणाऱ्या पिकांची माहिती, शेतीसाठी घेतलेले कर्ज, बंॅक किंवा साेसायटीचे नाव, अादी माहिती नाेंदवावी लागणार अाहे.
 
शेतकरी पुढील १२ प्रश्नांवर अापली मत नाेंदवणार अाहेत. यावर हाेत किंवा नाही यापैकी एका पर्यायावर खूण करावी लागणार अाहे. यामध्ये शेतकरी म्हणून अापण सुखी अाहात का ?, शेतीशिवाय अापले दुसरे काही उत्पन्न अाहे काय?, पिक विमा याेजनेचा तुम्हाला लाभ झाला अाहे का?,शेती करण्यासाठी तुमच्यावर कर्जाचा भार अाहे काय?, कर्ज वसुलीच्या दबावामुळे मनात अात्महत्येचा विचार येताे काय?, पंतप्रधानांनी केलेल्या नाेटबंदीचा तुम्हाला लाभ झाला काय?, सरकारकडे मागिलेले शेततळे मिळाले काय?, मागेल त्याला कर्ज, या मुख्यमंत्र्यांच्या घाेषणेचा लाभ झाला काय?, भारनियमनाचा त्रास सुरु अाहे का?, गत तीन वर्षात शेतमालास हमीभाव मिळाला काय?, सरकार निरपयाेगी ठरल्याची चीड मनात खदखदत अाहे का, या प्रश्नांचा समावेश अाहे. तसेच शेवटचा प्रश्न पिक विभा याेजनेचा हप्ता काेण भरते असा विचारणात अाला असून, यामध्ये मी अर्थात शेतकरी किंवा सरकार हे दाेन पर्याय देण्यात येणार अाले अाहेत. 

अशी असेल संवाद यात्रा 
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विराेधी पक्षांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्रा काढली हाेती. त्यानंतर अाता शिवसेनेही भाजपवर शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्यावरुन हल्ला सुरु केला अाहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाचे नेते, लाेकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे अावाहन केले. विराेधकांच्या संघर्ष यात्रेला भाजपने संवाद यात्रेच्या माध्यमातून उत्तर देण्याचा निर्धार केला. जिल्ह्यात २५ २६ मे राेजी संवाद यात्रा काढण्यात येणार असून, शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार अाहेत.
 
मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र 
शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘मी कर्जमुक्त हाेणारच’ या मथळ्याखाली पत्र लिहणार अाहे. हे पत्र शिवसेना कार्यालयात जमा करण्यात येणार असून, त्यानंतर पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार अाहेत. यापत्रात शेतीशी निगडीत प्रश्न तडीस नेणे कर्जमुक्ती याचा उहापाेह करण्यात येणार अाहे. पत्रात शेतकऱ्याचे नाव, त्याच्या कुटुंबातील सदस्य संख्या, शेतजमीन किती अाहे, घेणाऱ्या पिकांची माहिती, शेतीसाठी घेतलेले कर्ज, बँक किंवा साेसायटीचे नाव, अादी माहिती नाेंदवावी लागणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...