आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाठी झेलणाऱ्या "त्या' शिवसैनिकांचा सत्कार, संपर्कप्रमुख खासदार सावंत यांनी घेतली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मिती परिषद महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी बुधवारी अकोल्यात घेतली. अखंड महाराष्ट्राची भूमिका घेतलेल्या शिवसैनिकांनी या परिषदेला विरोध दर्शवला होता. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला होता. आंदोलनात अंगावर लाठ्या झेलणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी आयोजित पक्षाच्या बैठकीत केला.
शिवसेनेची अखंड महाराष्ट्राची भूमिका आहे. या भूमिकेला अनुसरून शिवसैनिकांनी विदर्भ राज्यनिर्मितीच्या परिषदेचा सनदशीर मार्गाने निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला शिवसैनिकांवर लाठीहल्ला केला होता. त्यात काही शिवसैनिक जखमी झाले होते. बैठकीत शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच मे रोजी शिवसेनेच्या अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेला अनुसरून जिल्हाभरात रॅलीचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा या वेळी खासदार अरविंद सावंत यांनी केली. शिवसैनिकांनी शासकीय योजनांची माहिती घेऊन नंतर ती शेतकरी, कष्टकरी, युवक महिलांना दारोदार जाऊन द्यावी, असे आदेशही सावंत यांनी शिवसैनिकांना दिले. तसेच या कार्यक्रमात बाळापूर तालुक्यातील दोन सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचेही या वेळी स्वागत करण्यात आले. बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, ज्ञानदेव परनाटे, चंद्रशेखर पांडे, हरिभाऊ भालतिलक, बंडू ढोरे, डॉ. विनित हिंगणकार, श्रीकृष्ण ढोरे, महानगर प्रमुखतरूण बगेरे, ज्योस्त्ना चोरे, उपमहापौर विनोद मापारी, नगरसेवक पंकज गावंडे, धनंजय गावंडे, तालुका प्रमुख मुकेश मुरुमकार, किशोर ठाकरे, विजय खिरडकर, संजय शेळके, शाम गावंडे, देविदास बोदडे, सुरेश सोळंके, सागर भारुका, दिलीप बोचे, डॉ. मनोज शर्मा, शरद तुरकर, राजकुमारी मिश्रा, मंजुषा शेळके, योगिता पावसाळे, वनिता पागृत, अरुणा देशमुख, शुभांगी किनगे, सुरेंद्र विसपुते, सुनिल रंधे, मुन्ना मिश्रा, संजय भांबेरे, रवींद्र टिकार, गोपाल दातकर, अक्षय भालतिलक,गणेश सारसे, गजानन चव्हाण, योगेश गिते यांच्या शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.