आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेने घ्यायला लावली अधिकाऱ्याला बोंडअळीची चव; पंचनामे करण्यासाठी केले आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्णी (यवतमाळ)- बोंड अळीमुळे बळीराजा अडचणीत असताना तालुका कृषी विभाग साखर झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करत शिवसेनेने आज आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यास बोंडअळीची चव घेण्यास भाग पाडले.

 

 

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे यांनी हजारो शेतकऱ्यांसोबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले, माञ त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी हजर नसल्याने प्रविण शिंदेंसह शिवसैनिक संतप्त झाले. कृषी अधिकारी यांच्या टेबलवर बोंड अळीने खराब झालेली कापसाची झाडे ठेवण्यात आली. काही वेळानंतर तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड हे कार्यालयात आले असता त्यांना शिवसेनेचे नेते व शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.


तालुक्यात कधी नव्हे एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली असताना तालुका कृषी अधिकारी व कृषी सेवक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे यांनी केले.


 शिवसैनिक आणि शेतकरी आक्रमक झाल्याने तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांना त्यांच्या टेबल वर ठेवण्यात आलेल्या कापसाच्या बोंडाची पाहणी करा असे सांगण्यात आले, माञ तालुका कृषी अधिकारी यांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उध्दट वागणूक देत असल्याने शेतकऱ्यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे यांना सांगितले. त्यामुळे प्रविण शिंदे तालुका कृषी अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.


 यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना धारेवर धरत शेतकऱ्यांबदल जाब विचारला. सरकारकडून तुम्ही पगार कशासाठी घेता. शेतकऱ्यांची कामे करता येत नसतील तर राजीनामे देऊन घरी बसा, असे ते म्हणाले. 


तालुक्यातील बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्याची मागणी यावेळी शिवसेनेनी लावून धरली. आठ दिवसाच्या आत तालुक्यातील बोंड अळीग्रस्त शेतीचे पंचनामे न झाल्यास शिवसेना कृषी विभागाचा पंचनामा केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे यांनी दिला.


तालुका कृषी अधिकारी यांना शिवसेनेने घेराव घातल्याने कृषी कार्यालयात चांगलेच वातावरण तापले होता. दरम्यान तहसीलदार यु.डी.तुंडलवार यांनी कृषी कार्यालयात येऊन हे प्रकरण मिटवले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...