आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री गुलाबराव गावंडेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’,शरद पवार यांची घेतली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - माजीराज्यमंत्री गुलाबराव गावंडे लवकरच शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या पृष्ठभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची रविवारी भेट घेतली. प्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे. या घडामोडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
अकोला जिल्ह्यात शिवसेना स्थापनेपासून गुलाबराव गावंडे पक्षात आहेत. शिवसेनेच्या विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र काही महिन्यांपासून त्यांची शिवसेनेच्या कार्यक्रमातील अनुपस्थिती शिवसैनिकांना अस्वस्थ करणारी आहे. शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांच्या जिल्हा दौऱ्यातही ते दिसत नव्हते.

दरम्यान, उपरोक्त पृष्ठभूमीवर गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊ चर्चा केली. यावेळी रामेश्वर पवळ, युवराज गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. गुलाबराव गावंडे हे लवकरच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह इतरही नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीनंतर पक्ष प्रवेशाची घोषणा होणार उर्वरित.पान
शिवसेनेचेे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची रविवारी भेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...