आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीला फाटा देण्यासाठी मध्यावधीचे सोंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. परंतु, त्यांना कोणीही गांभिर्याने घेत नाही.ही खरी शोकांतिका आहे. तर कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणुक दिल्या जाते.परंतु, शिवसेनेने शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या मागण्यांसाठी मैदानात उतरली. आता शेतकरी कर्जमुक्तच करायचा असेल तर त्याला कुठलाही निकष लावता कर्जमुक्ती दया अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला फाटा देण्यासाठी भाजप मध्यवर्तीचे साेंग आणत होते असा आरोपही केला. शेगाव येथे शिवसेनेचा शेतकरी कृतज्ञता मेळावा आज शुक्रवार, १५ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. 
 
मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतही त्यांनी मध्यवर्ती निवडणुक पुढे करून शेतकऱ्यांच्या कर्ज मुक्तीला फाटा देण्यासाठी भाजपाचा कट रचत असल्याचा आरोप केला. मध्यवर्ती निवडणुकीची तयारी असेल तर तो पैसा शेतकऱ्यांना द्या त्यांचा पूर्ण सातबारा कोरा करा कुठलाही निकष लावू नका शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करता ह्या विषयाला कुठ तरी फाटा देत असल्याचा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला शेगावात शेतकरी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर स्थानिक विश्राम भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी ना रामदास कदम, ना दिवाकर रावते, ना संजय राठोड, खा. विनायक राऊत, खा. चंद्रकांत खैरे, खा. अरविंद सावंत, मुंबई महापौर विश्वनाथ महाडेकर, शिवसेना प्रवक्ता निलमताई गोरे, खा गुलाबराव पाटील, खा.भावनाताई गवळी, आ.गोपीकिशन बाजाेरिया, आ.श्रीकांत देशपांडे , तसेच बुलडाणा खासदार, आमदार यांची उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी एक ठिणगी टाकून वेगळी क्रांति घडविली. आम्ही सत्तेची परवा करता पहिल्या पासून उघड उघड शेतकऱ्यांच्या सोबत राहिलो कर्जमुक्तीसाठी अभियान सुरु असतांना शेतकऱ्यांनी विविध आंदोलन केली संप केले त्यावेळी सुद्धा शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे होती आम्ही उघड पाठिंबा दिला. 

भाजपाने कर्ज मुक्ती जरी केली असली तरी निकष ठरल्यावरच शेतकरी कर्ज मुक्त होईल संपूर्ण कर्ज माफी मिळते की नाही हे लक्ष ठेवण्यासाठी शिवसैनिक सज्ज राहणार आहे. सरकारने असे निकष ठरू नये की शेतकऱ्यांना काही लाभ मिळणार नाही असा टोला त्यांनी बोलतांना लगावला. दीनदुबळा शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकार कडे बघतोय, आम्ही सरकार मधे राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतकरी कर्जमुक्त झाल्यावर तो पुन्हा कर्जाच्या वेढ्यात अडकणार नाही ह्याची उपाय योजना करायला आम्ही सूचवणार आहो. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी भाजपाला ताकद सदबुद्धी दे हे साकडे घालण्यासाठी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलेे. 

 
बातम्या आणखी आहेत...