आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत हाेणार फेरबदल, संपर्कप्रमुख खासदार सावंत यांचे सूताेवाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पृृृष्ठभूमीवर शहरातील विविध भागातील शिवसैनिकांशी संवाद साधला असून, शिवसेनेच्या रचनेत बदल करणे अावश्यक असल्याचे मत संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले. ते शनिवारी जिल्ह्याच्या दाैऱ्यावर हाेते. त्यामुळे शिवसेनेत फेरबदल हाेण्याचे संकेत प्राप्त झाले अाहेत.
महापालिका, राज्य केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेत शिवसेना सहभागी अाहे. मात्र शिवसेना भाजप एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी साेडत नाही. राज्य केंद्राप्रमाणे शिवसेना मुंबईसह इतर महापालिकांमध्ये लहान भावाच्या भूमिकेत राहण्याच्या मानसिकेत नाही. जिल्ह्यात यावर्षी शेवटी नगर पालिका अाणि पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुका हाेणार अाहेत. सध्या पक्ष बांधणी अाणखी मजबूत करण्यात येत असून, त्यानंतरच युतीबाबत निर्णय घेण्यात येईल. काेणत्याही परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी शिवसैनिक सक्षम अाहेत. सर्व भागातील शिवसैनिकांशी संवाद साधताना शाखा प्रमुखांना काही मूलभूत प्रश्न विचारले. त्यांना अनेक बाबी माहीत नसल्याचे पुढे अाले. िशवसैनिकांकडून काही बाबी जाणून घेतल्या. पक्ष बांधणीनंतर लवरकच सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा दावाही खासदार सावंत यांनी केला. यावेळी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, उपमहापाैर विनाेद मापारी, महानगराध्यक्ष तरूण बगेरे, माजी अामदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा, उपशहर प्रमुख याेगेश अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख, महादेव गवळे, संताेष अनासने, गजानन चव्हाण, धनंजय गावंडे उपस्थित हाेते.

वंचितांच्या वेदना : मराठामाेर्चाच्या पृष्ठभूमीवरही खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केले. या वंचितांच्या वेदना असून, प्रत्येक समाजातील गरीबांना सर्वच प्रकारच्या सुविधा, लाभ मिळणे अावश्यक अाहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर विशेष अधिवेशन बाेलवण्याची मागणी केल्याची अाठवणही त्यांनी करुन दिली.

अंदाज अाला नाही : जूनमहिन्यात झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाअाघाडीत शिवसेना हा घटक पक्ष असतानाही शिवसेनाच्या दाेन सदस्यांनी महाघाडीच्या उमेदवारांना मतदान केले नाही. या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर खासदार अरविंद सावंत स्वत अकाेल्यात हाेते. हे दाेन सदस्य महाअाघाडीला पाठिंबा देणार नाहीत, दगाफटका करतील, याचा अंदाज अाला नाही, असेही खासदार सावंत म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...