आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवरुन सत्ताधारी शिवसेनेचे तिसरे अांदाेलन; सरकारवरही टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केंद्र व राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन साेमवारी महामाेर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडलेल्या या महामाेर्चात शेतकरी ग्रामीण भागातून अालेले शिवसैनिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. महामाेर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेत सेना नेत्यांनी सरकारवर टिका करीत सरसकट कर्जमाफिची मागणी केली. त्यानंतर नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. 
 
कर्जमाफीसाठी अाॅनलाईज अर्ज भरताना शेतकऱ्यांना सेतू केंद्रांवर प्रचंड त्रास लूट हाेत अाहे. या मुद्यावरुन शिवसेनेने साेमवारी महामाेर्चा काढला. महामाेर्चाला जिजाऊ हाॅल येथून प्रारंभ माेर्चा. टाॅवर चाैक, मदनलाल धिंग्रा चाैक, पंचायत समिती मार्गाने निघालेला महामाेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महामाेर्चा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, अामदार गाेपिकिशन बाजाेरीया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी अामदार संजय गावंडे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात अाला. महामाेर्चात गाेपाल दातकर, बंडू ढाेरे, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, महादेवराव गवळे, संजय शेळके, प्रदीप गुरुखुद्दे, ज्याेत्सना चाेरे, सुनिता मेटांगे, राजेश्वरी शर्मा अादी सहभागी झाले हाेते. 
 
सेना नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लगावला टाेला : जिल्हाधिकाऱ्यांच्याकक्षात पेक्षा जास्त सेना नेते, पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कक्षा बाहेर बंदाेबस्तासाठी असलेल्या संबंधित पाेलिस निरीक्षकाला अातमध्ये बाेलावले. पेक्षा जास्त जणांना अात का साेडले, नियम काय अाहे, असे एक ना अनेक सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पाेलिस निरीक्षकाला केले. यानंतर असे हाेता कामा नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी पाेलिस निरीक्षकाला बजावले. यावर ‘अशाच पद्धतीने नियमांचे पालन कर्जमाफिचे अर्ज भरण्यात येत असलेल्या सेतू केंद्रावर व्हावे’, असा टाेला माजी अामदार संजय गावंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लगावला. महामाेर्चात शेकडाेंच्या संख्येने शिवसैनिक शेतकरी सहभागी झाल्याने २०-३० पदाधिकारी कक्षात अाल्यास काेणता फरक पडताे, असा सवाल जिल्हा प्रमुख देशमुख यांनी केला. 
 
नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर वाचला महसूल यंत्रणेच्या काराभाराचा पाढा : सेनानेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमाेर वाचला महसूल यंत्रणेच्या बेताल काराभाराचा पाढाच वाचला. तूरीचे चुकारे साेयाबीनच्या बाेनसपासून शेतकरी वंचित अाहेत. ६४ खेडी पाणी पुरवठा याेजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली अाहे. तलाठी ना मुख्यालयी थांबत ना व्यवस्थित सर्वे करत, अशा शब्दात जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांच्यासमाेरच महसूल यंत्रणेच्या बेताल काराभाराचा पाढा वाचला. शासनाने जाहीर केलेल्या ३६ हजार काेटी रुपयांच्या कर्जमाफिचा लाभ जिल्हयातील किती शेतकऱ्यांना हाेणार अाहे अाणि किती रुपयांचे कर्जमाफ हाेणार अाहे, असे अामदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी विचारले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लाख ५३ हजार अर्ज भरले असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...