आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमालास ना हमीभाव, ना सिंचनाचा लाभ झाला; शिवसेनेचा सर्व्‍हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यात शेतीशी निगडित प्रश्नांवरून शिवसेनेने सर्व्हे केला असून, शेतकऱ्यांकडून १२ प्रश्नांच्या माध्यमातून भावना जाणून घेतल्या. सरासरी ९८ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी गत तीन वर्षात शेतमालाला हमी भाव मिळाला नसल्याचे सांगितले. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी सरकारकडे मागितलेले शेततळे मिळाले नसल्याचेही मत नाेंदवले.
 
त्यामुळे सिंचनाचा लाभ झालेला नाही, असे सर्व्हेवरून दिसून येते. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण लाख २७ हजार ८९० अर्ज वितरित करून तळागळातून मते जाणून घेण्यात अाली. चार मतदारसंघात या सर्व्हेची माहिती शिवसेनेने पक्षश्रेष्ठींना सादर केली असून, शिवसेना या माहितीच्या अाधारे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची विधानसभेच्या मतदारसंघनिहाय काेंडी करणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत अाहे. 
 
दरम्यान, शिवसेनेच्या या सर्वेक्षणात सरकार निरुपयाेगी ठरल्याचे मत लाख २७ हजार १४२ शेतकऱ्यांनी नाेंदविले असून, ५४८ जणांना सरकार उपयाेगी असल्याचे म्हटले अाहे. शेतकरी कर्जमुक्तीवरून शिवसेना केंद्र, राज्य सरकारला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडत नाही. शेतकरी कर्जमाफीबाबतही शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम अाहे. जिल्ह्यात सध्या जवळपास दीड लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून, अाॅनलाइन अर्ज भरण्यात येत अाहे. कर्जमाफी, शेतीच्या मुद्यावरून शिवसेना अागामी निवडणुकांमध्ये भाजपवर टीकास्त्र साेडणार असून, पक्ष स्वबळावर कसे लढता येईल, या दृष्टिकाेनातून प्रयत्न करीत अाहे. मात्र, जिल्ह्यात भाजपची वाढती राजकीय ताकद लक्षात घेता स्वबळावर निवडणुका जिंकणे शिवसेनेला साेपे नाही. शिवसेनेला भाजपच्या तुलनेने प्रचंड परिश्रम घ्यावे लागणार अाहे. 
 
असा केला सर्व्हे 
सेनेनेविधानसभेच्या बाळापूर, मूर्तिजापूर, अकाेला पूर्व अकाेट मतदारसंघात सर्व्हे केला. प्रत्येक मतदारसंघात ३५ हजार प्रश्नावली असलेले अर्ज भरून घेतले. यामध्ये बाळापूरमध्ये ३३ हजार ४३०, मूर्तिजापूर ३२ हजार २००, अकाेला पूर्व-२९ हजार ७०० तर अकाेट मतदारसंघात ३२,६५० अर्जांचा समावेश हाेता. 
 
अशी नाेंदवली मुख्य पाच प्रश्नांवर मतं 
सर्व्हेमध्ये कर्ज वसुलीच्या दबावामुळे मनात अात्महत्येचा विचार येताे काय, असा प्रश्न विचारण्यात अाला हाेता. यात नाही असे उत्तर देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६९ हजार १३२ तर हाेय म्हणणाऱ्यांची संख्या ५८ हजार ७५८ एवढी हाेती. 
 
अशी हाेती प्रश्नावली : शेतकऱ्यांनी पुढील १२ प्रश्नांवर अापले मत नाेंदविले. चारही मतदारसंघात शेतकरी म्हणून अापण सुखी अाहात का? या, शेतीशिवाय अापले दुसरे काही उत्पन्न अाहे काय?, शेती करण्यासाठी तुमच्यावर कर्जाचा भार अाहे काय?, भारनियमनाचा त्रास सुरू अाहे का?, सरकार निरुपयोगी ठरल्याची चीड मनात खदखदत अाहे का, या प्रश्नांचा समावेश हाेता. 

असा केला सर्व्हे 
सेनेने विधानसभेच्या बाळापूर, मूर्तिजापूर, अकाेला पूर्व अकाेट मतदारसंघात सर्व्हे केला. प्रत्येक मतदारसंघात ३५ हजार प्रश्नावली असलेले अर्ज भरून घेतले. यामध्ये बाळापूरमध्ये ३३ हजार ४३०, मूर्तिजापूर ३२ हजार २००, अकाेला पूर्व-२९ हजार ७०० तर अकाेट मतदारसंघात ३२,६५० अर्जांचा समावेश हाेता. 
बातम्या आणखी आहेत...