आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : शिवसेनेची दादागिरी, बॅंक कर्मचा-याला मारहाण करून गुंडगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँक कर्मचा-याला मारहाण करताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे... - Divya Marathi
बँक कर्मचा-याला मारहाण करताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे...
यवतमाळ- यवतमाळमधील आर्णी येथील सेंट्रल बँकेमध्ये शेतकरी ग्राहकांकडून बँक कर्मचारी रक्कम काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप करत बुधवारी शिवसैनिकांनी बँकेतील कर्मचा-यांवर हात उचलला. राजू पाटील असे मारहाण झालेल्या बॅंक कर्मचा-याचे नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आर्णी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेतील पाटील नामक कर्मचारी कामे करून देण्यासाठी व पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक कामात पैसे घेत होता, अशी तक्रार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, तालुकाप्रमुख रवी राठोड यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. त्या आधारे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे, रवी राठोड यांनी काही शिवसैनिकांना घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये गेले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले शाखा मॅनेजर सतीश पाठोळकर यांना याबाबत विचारणा केली असता, बँक प्रतिनिधी राजू पाटील यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्याच्या उत्तराने शिवसैनिकांचे समाधान न झाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी मॅनेजर यांच्या कॅबिनमध्येच त्याला मारहाण केली.
बँकेत राडा झाल्यानंतर काही वेळातच उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुधीर पवार, गटविकास अधिकारी सी. जी. चव्हाण यांनी भेट देऊन संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकारी, शेतकऱ्यांचे म्हणणे समजून घेतले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पैसे घेणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांविरोधत लेखी तक्रार दिली. मात्र, उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, VIDEO.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)