आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेट टॉप बॉक्स'अभावी हजारो ग्राहकांना मनस्ताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सेट टॉप बॉक्स लावण्याच्या आदेशाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हजारो घरातील टीव्ही सध्या रिकामे डबे झाले असून, त्यावर फक्त मुंग्या दिसत आहेत. सेट टॉप बॉक्स घेण्यासाठी ग्राहकांची धावपळ सुरू आहे. मात्र, ते उपलब्ध नाहीत. डीटीएच ग्राहकांचीही विक्रेत्यांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरी भागात केवळ ९,५०० सेट टॉप बॉक्स लावले गेले असून, हजारो लोकांचे टीव्ही बंद झाल्यामुळे त्यांचा मनस्ताप वाढला आहे. या समस्येवरील उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह कायमच आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अॅनाॅलाॅग सिग्नल बंद झाले आणि डिजिटल सिग्नल सुरू झाले आहेत. केबल कनेक्शनधारकांची यात सर्वात मोठी गोची झाली. शासनाने सहा महिन्यांपूर्वी निर्धारित करूनही केबल ऑपरेटरने याकडे दुर्लक्ष करत सेट टॉप बॉक्स लावण्याची घाई केली नाही. नागरिकांनी केबल ऑपरेटरकडे नोंदणी करूनही सेट टॉप बॉक्स उपलब्ध नाही, असे सांगून टोलवाटोलवी करण्यात आली. त्यामुळे केबल कनेक्शन निरुपयोगी झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केबल ऑपरेटरधारकांना कोणत्याही गाइडलाइन्स दिलेल्या नाहीत. त्यामुळे केबल ऑपरेटर मनमानीप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठी रक्कम वसूल करत आहेत. प्रसारण सेवेचे डिजिटलायझेशन झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्यातही प्रथम नागरी भागात ही प्रणाली अमलात आली आहे. ग्रामीण भाग तूर्तास यातून सुटला आहे. अकोला शहरासह इतर तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा विविध केबल नेटवर्कच्या माध्यमातून सेट टॉप बॉक्स लावून देण्यासाठी वेगवेगळे दर आकारत आहेत. यावर सरकारी यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नाही. या सर्व परिस्थितीत मात्र करमणूक कर विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. या सर्व प्रकाराची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दखल घेऊन ग्राहकांच्या हिताचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

सुविधांमध्ये नाही ताळमेळ : शासनम्हणते की, ग्राहकांच्या मर्जीनुसार त्यांना चॅनल्स बघता येतील. जेवढे चॅनल्स ग्राहक बघतील तेवढाच पैसा त्यांना द्यावा लागेल. खासगी डीटीएचवर ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, केबल कनेक्शन संचालक जे दाखवील तेच नागरी भागातील ग्राहकांना बघावे लागत आहे. मग येथे ग्राहकांची मर्जी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही भागांत अॅनाॅलॉग सिग्नल सुरू : जिल्ह्यातीलकाही नागरी भागांत केबल संचालकांकडून अॅनाॅलॉग सिग्नल देणे सुरू केले आहे. ही शासनाची फसवणूक असून, याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कारवाईची भूमिका बजावणे आवश्यक झाले आहे. जिल्हा करमणूक कर विभागाचे केबल ऑपरेटरसोबत असलेल्या मधुर संबंधांमुळे कारवाई थांबल्या आहेत असा आरोप होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक : सेटटॉप बाॅक्सचा सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केबल ऑपरेटर्सची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. ग्राहकांची लूट होणार नाही, असे सांगून चांगली सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. मात्र सध्या बंद झालेल्या टीव्ही तुर्त सुरू करण्याच्या उपाययोजनावर प्रश्नचिन्ह कायमच आहे.

येथेकरावी तक्रार : स्थानिककेबल संचालकांकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत ग्राहक जिल्हाधिकारी, ग्राहक मंच याशिवाय भारतीय दुरसंचार निगम प्राधीकरण (ट्राय)कडे तक्रार करू शकतात.

असे आहेत पर्याय
>आरआरसी केबल नेटवर्क
>यूसीएन केबल नेटवर्क
>एससीएन केबल नेटवर्क
>एटीएन केबल नेटवर्क
बातम्या आणखी आहेत...