आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्विदिवसीय ‘श्रावणसरी’ संगीत महोत्सव आयोजित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोलेकरांना दोन दिवसीय श्रावणसरी या संगीत महोत्सवाची मेजवानी २९ ३० जुलैला उपलब्ध होणार आहे. अभिरुची प्रतिष्ठान, सर्वेश इव्हेंटस आणि दिव्य मराठीच्या वतीने या चॅरिटी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पंडीत रघुनंदन पणशीकर, पंडीत रोणू मुजुमदार, अभिजित आपस्तंभ आपली कला सादर करणार आहेत. 
 
स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात २९ जुलैला सायंकाळी ६.३० वाजता स्व.किशोरीताई अमोणकर यांचे शिष्य तथा नाट्य कलावंत स्व. प्रभाकर पणशीकर यांचे पुतणे पंडीत रघुनंदन पणशीकर गायन सादर करणार आहेत. स्व.अप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य हनुमंत फडतरे (तबला) आणि सुरेश फडतरे (संवादिनी) यांची जुगलबंदी रंगणार आहे. तर ३० जुलैला नांदेड येथील प्रख्यात गायक अभिजित आपस्तंभ यांचे गायन आणि सारेगामा फेम पंडीत रोणू मुजुमदार यांचे सुश्राव्य बासरी वादन होणार आहे. साथ संगत फडतरे बंधु तसेच प्रशांत गाजरे करणार आहेत. 

कार्यक्रमासाठी अमोल पाटील, आनंद जागीरदार, रितेश खोत, नितिन रेळकर, विवेक पाटील, नंदु त्रिवाड, अमोल देशपांडे, अतुल देशपांडे, संजय जोशी, घन:शाम धनवानी, पंकज देशमुख, प्रविण सारभुकन, अजय संगवई, नंदु देशमुख, गुंजन लांडगे, अनंत सरोदे, संदीप काळे, श्रीकांत कोरान्ने, मुरली कुचर, विवेक पाटील, अनुराग जोशी, शामराव कुळकर्णी आदी पुढाकार घेत आहेत. 

अनाथ मुलांना केली जाणार शालेय मदत 
या चॅरिटी शो मधून शिल्लक राहिलेल्या रकमेतून एचआयव्ही ग्रस्त तसेच अनाथ मुलांना (विद्यार्थ्याना) शालेय मदत केली जाणार आहे.