आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७० वर्षांपासून त्यांना स्मशानभूमीच नाही, अंत्ययात्रा थेट तहसीलवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रामपूर (जि. बुलडाणा) - तालुक्यातील वरवट बकाल येथे बौद्ध मातंग समाजासाठी कायमस्वरुपी स्मशानभूमी नसल्याने एका ७० वर्षीय मृत महिलेची अंत्ययात्रा घेऊन समाज बांधव संग्रामपूर तहसीलवर धडकले. ही घटना सप्टेंबर रोजी घडली. वरवट बकाल येथे बौद्ध, मातंग समाजाची ३०० घरे असून एक हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या समाजासाठी हक्काची अशी स्मशानभूमी नाही. मागील १४ वर्षांपासून महसूल विभागाकडे समाजबांधव स्मशानभूमीची मागणी करीत आहेत. अखेर त्यांच्या संयमाचा बांध गुरुवारी फुटला. सप्टेंबर रोजी सायंकाळी लिलाबाई बळीराम इंगळे (वय-७०) निधन झाले. अंत्यसंस्कार विधीसाठी जागा नसल्याने समाजबांधवांसाठी मृतदेह वरवट बकाल ते जळगाव रस्त्यावर हनुमानाच्या मंदिराजवळ रस्त्यावर ठेवून दोन तास रास्ता रोको केला. नंतर मृतदेहासह तहसीलवर धडक दिली.
बातम्या आणखी आहेत...