आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माँसाहेबांनी येथेच गिरवले युद्धकलेचे धडे, फोटोतून पाहा शिवरायांच्‍या मामाचे गाव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा- सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्‍मगाव. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. याच जाधवांच्‍या वाड्यात 12 जानेवारी 1598 रोजी राजमाता माँसाहेबांचा जन्‍म झाला होता. आजही हा दिवस सिंदखेडराजा येथे मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. या वाड्यातील ऐतिहासिक वास्‍तू आजही मोठ्या दिमाखात उभ्‍या आहेत.

राजमाता जिजाऊ जन्‍मोत्सव यंदाही मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या अनुशंगाने आज आम्ही आपल्यासाटठी जाधवांच्‍या वाड्यातील काही वास्‍तू व ऐतिहासिक प्रसंगांबाबत रंजक माहिती घेऊन आलो आहे.

जाधवांच्‍या वाड्यातील ऐतिहासिक वास्‍तू
लखुजी जाधवांच्‍या सिंदखेडमधील वाड्यात, रंगमहाल, सावकारवाडा, लखुजी राजांची समाधी, गंगासागर, बाळसमुद्र नावाच्‍या विहीरी, चांदणीतलाव असे अनेक ऐतिहासिक जलसाठे व वास्‍तू आहेत. दरवर्षी जिजाऊ जन्‍मोत्‍सवाला राज्‍यातील हजारो लोक येथे भेट देतात.

माँसाहेबांनी येथेच गिरवले युद्धकला नि राजकारणाचे धडे
सिंदखेडराजामधील मोती तलावाच्या बाजूच्या असलेल्‍या पठारावर राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या असे सांगितले जाते. याच ठिकाणी त्‍यांनी युद्धकला नि राजकारणाचे शिक्षण घेतले, असेही म्‍हणतात. त्‍यामुळे हा परिसर देशाच्‍या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे.

- राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्‍ये सिंडखेड राजा येथे झाला. 
- जिजाऊंच्‍या आईचे नाव म्हाळसाबाई होते. 
- लखूजीराजे जाधव यांनी मुलांबरोबरच जिजाऊंनाही राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. 
- जिजाऊंनी येथे युद्धकला नि राजनीतीमध्‍ये प्रावीण्य मिळवले. 
- याचाच उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, छत्रपती शिवरायांच्‍या मामाच्‍या गावातील फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...