आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिसे उदेगावात दोन गटात हाणामारी, 29 जणांवर गुन्हे, 20 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- नजिकच्या सिसा उदेगाव येथे सोमवारी सायंकाळदरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तीन जण जखमी झाले. दरम्यान, दोन्ही गटाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध एकूण २९ जणांवर गुन्हे दाखल केले. पैकी २० जणांना पोलिसांनी अटक केली. परिस्थितीवर पोलिस नियंत्रण ठेवून असून, सिसा उदेगाव येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 
 
गोपाळ चचाणे याचा जावाई संतोष तेवारे हा एका कास्तकाराकडे कामावर होता. त्याला कामावरून सदर मालकाने गत तीन महिन्याआधी बंद केले होते. तर कामावरून बंद करण्यामागे शिवाजी इंगळे हाच असावा असा संशय हाेता, तर सोमवारी सायंकाळी गोपाल चचाणे चंदन इंगळे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद मिटलाही होता. मात्र, रात्रीदरम्यान, संतोष इंगळे चंदन इंगळे यांनी बाहेर गावावरून आपले नातेवाईक उदेगावात बोलावले. चचाणे यांच्या घरात घुसून मारहाण केली. 
 
घटनेची माहिती बोरगावमंजू पोलिस निरीक्षक पी. के. काटकर यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिसा उदेगाव गाठले. दरम्यान, दोन्ही गटात हाणामारी झाली. त्यामध्ये तीन जण जखमी झाले, तर बाहेर गावातून आलेल्यांनी मोटार सायकल सोडून पळ काढला. मोटारसायकल जागेवर असल्याने सहा मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. 
 
दरम्यान, घटनास्थळी अतिरक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, एसडीपीओ कल्पना भराडे, ठाणेदार पी. के. काटकर यांच्यासह अतिरिक्त पोलिस तुकडीस पाचारण करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी रात्रभर सिसा उदेगावात तगडा बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशीरापर्यंत पोलिस अधिकारी कर्मचारी परिस्थितीवर नियंयण ठेवून होते.

 दरम्यान, घटनेची फिर्याद चंदन इंगळे यांनी पोलिसात दिल्यावरून गोपाल चचाणे याच्यासह त्याचे साथीदार यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, तर गोपाल चचाणे याच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. अशाप्रकारे २९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पैकी २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये सचिन सहारे, देवराव म्हैसने, चेतन दहातोंडे, दिनेश राऊत, पंकज चचाणे, उमेश शेंद्रे, कृष्णा ठाकरे, गोपाल चचाणे, मंगेश चचाणे, धनराज सहारे, अक्षय सहारे तर दुसऱ्या गटातील संतोष शिवाजी इंगळे, चंदन शिवाजी इंगळे, शिवाजी इंगळे यांचा समावेश आहे. 
 
सिसा उदेगाव येथे बाहेर गावातून आलेल्यांनी मोटार सायकल सोडून पळ काढला. मोटारसायकल जागेवर असल्याने सहा मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...