आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैशल्य विकासाच्या याेजनांवरुन भाजप लाेकप्रतिनिधी अामने-सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - केंद्रशासनाच्या काैशल्य विकासाच्या विविध याेजनांवरुन भाजप लाेकप्रतिनिधी रविवारी भारतीय जनता युवा माेर्चातर्फे अायाेजित युवा मेळाव्यात अामने-सामने अाले. स्किल इंडिया, स्टारर्टप इंडिया यासारख्या याेजनांचा फायदा केवळ मुंबई, पुणे येथील युवकांना मिळत असल्याची खंत अामदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली. यावर काैशल्य विकास केंद्राचा प्रस्ताव अाल्यास विनाविलंब मंजूर करण्यात येईल, असे अाश्वासन पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी दिले. त्यानंतर काैशल्य विकासाच्या याेजना सर्वांपर्यंत पाेहाेचविण्याचे अावाहन खासदार संजय धाेत्रे यांनी केले.
खंडेलवाल भवनमध्ये भाजयुमाेतर्फे दिग्विजय दिनाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. स्वाामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये भारतीय संस्कृती राष्ट्रीयत्वाचे महत्व विषद केल्यामुळे ११ सेप्टबर हा दिवस दिग्विजय दिन म्हणून साजरा करण्यात येताे. यानिमित्त अायाेजित जिल्हा मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजयुमाेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अरसड, अामदार अकाश फुंडकर, अामदार हरिष पिंपळे, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात, महानगराध्यक्ष किशोेर मांगटे, महापाैर उज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, गिरीश गाेखले, जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने, रमण जैन अादी प्रामुख्याने उपस्थित हाेते. उपस्थित मान्यवरांनी मनाेगत व्यक्त केले. युवकांमध्ये देशभक्ती, संस्कार निर्माण व्हावे यासाठी अायाेजित केलेल्या मेळाव्यात युवक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. मेळाव्यात नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. सूत्रसंचालन भाजयुमाेच्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप सांगळे अंबरीष कविश्वर यांनी केले. अाभार महानगरध्यक्ष अनुप गाेसावी यांनी केले.

मुद्रायाेजनेचा लाभ घ्या-अामदार सावरकर : युवकांनीमुद्रा याेजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अावाहन अामदार रणधीर सावरकर यांनी केले. युुवकांनी व्यावसायिक ज्ञान अवगत करावे. सर्वांगिण विकासासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही. यासाठी युवकांनी शारिरीकदृष्ट्या सक्षम असणे अावश्यक अाहे, असेही सावरकर म्हणाले.

निवडणुकांमध्ये युवकांना संधी-अामदार शर्मा : अागामीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना संधी देण्यात येईल, , अशी ग्वाही अामदार गाेवर्धन शर्मा यांनी दिली. भाजयुमाेतूनच नेतृत्व घडते. त्यामुळे युवकांनी अाता नेत्याना ‘अागे बढाे’ असे म्हणण्या पेक्षा स्वत:साठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

नेत्यांची दिला शतप्रतिशत भाजपचा नारा : मनपानिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे युती करण्यासाठी उत्सुक असतानाच युवा मेळाव्यात मात्र भाजप नेत्यांनी यंदा पुढील वर्षाच्या प्रारंभी हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपचा नारा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची स्थिती मजबूत नाही. त्यामुळे अागामी निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांचे हरण हाेईल, यासाठी कंबर कसा, असे अावाहन पालकमंत्री डाॅ. पाटील यांनी केले. निवडणुका म्हणजे परिक्षा असते, असे खासदार धाेत्रे म्हणाले. भाजपची मनपामध्ये सत्ता असून, स्वच्छता अभियानसह इतरही उपक्रम यशस्वी हाेण्यासाठी सामुहिक प्रयत्न हाेणे अावश्यक अाहे, असेही ते म्हणाले.

पदवीधर निवडणुकीचा विषय गायब : पदवीधरनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार म्हणून पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांचे नाव यापूर्वीच जाहीर केले असले तरी या विषयावर युवा मेळाव्यात चर्चा झाली नाही. पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील खासदार संजय धाेत्रे यांचे ‘सख्य’ जाहीरच अाहे. यापृष्ठभूमीवर भाजप नेत्यांनी नगर परिषद, मनपा निवडणुकांबाबत वक्तव्ये केली. त्यामुळे पदवीधर निवडणुकांमध्ये प्रचारासाठी भाजपचे काेणते नेते पुढाकार घेतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेणार अाहे.
याेजनांचा गैरफायदा घेणे टाळा- खासदार
शासनाच्या विविध याेजनांचा गैरफायदा घेणे टाळा, असे अावाहन खासदार संजय धाेत्रे यांनी केले. शेवटच्या घटकाचा उदय, ही भाजपची विचारधारा अाहे. त्यामुळे स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या याेजना सामन्यांपर्यंत पाेहाचवाव्या. मागणीचे काैशल्य अात्मसात करणे अावश्यक अाहे. यासाठी शहरासह ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे अाहे. चारित्र्य संपन्न बलशाली राष्ट्राच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार, असेही खासदार धाेत्रे म्हणाले.
राष्ट्र उभारणीत युवकांचे याेगदान - पालकमंत्री

हिंदवी स्वराज्याची स्थापना, स्वातंत्र्याच्या लढ्यात युवकांचे याेगदान हाेते. युवकांमधून राज्य, देशपातळीवरील नेतृत्व घडणार अाहे, असे मत पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले. युवकांनी काैशल्य विकासाची कास धरुन संधीचे साेने करावे. स्किल इंडिया, स्टार्टप इंडिया यासारख्या याेजनांकडे युवकांचा अाेढा दिवसेंदिवस वाढतच अाहे. केंद्र राज्य शासनाच्या सर्वच याेजना ग्रामीणभागापर्यंत पाेहाेचवा असे अावाहनही पालकमंत्र्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...