आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही साद द्या, आम्ही आवाज देऊ; ठाणेदार गजानन शेळके यांची ज्येष्ठांना ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- तुम्ही साद द्या आम्ही आवाज देऊ. तुमच्या समस्या आम्हाला निर्भिडपणे सांगा, त्यासाठी पोलिस धावून येतील. आम्ही असताना परकेपणाची भावना मनात आणू नका, असे भावनिक आवाहन खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके यांनी केले. शनिवारी त्यांनी खदान पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांची एक सभा घेतली त्यात ते बोलत होते. खदान पोलिस ठाण्याला स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्यात येत आहे.
 
या पार्श्वभूमीवर खदान पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांची सभा घेण्यात आली. या सभेला खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना ठाणेदार शेळके म्हणाले की, तुमच्या कौटुंबिक समस्या आम्हाला बिनदिक्कतपणे शेअर करा. आम्ही त्यावर उपाय शोधू. त्यासाठी माझा नंबर तुमच्यासाठी २४ तास खुला आहे. तसेच पोलिस ठाण्याचा नंबर तुमच्या जवळ असू द्या.

अडचण आल्यास सांगा. तुमच्यासाठी पोलिस तत्पर असतील. यावेळी त्यांनी ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सौजन्याची वागणूक देण्याच्याही सूचना दिल्या. या सभेला माँ गायत्री, ज्येष्ठ नागरिक मंच कौलखेड, सिंधू सिनिअर असोसिधन सिंधी कॅम्प इतर ज्येष्ठ नागरिकांसह रामदास शेंडे, महादेवराव अबुलकर, सुभाष ठाकरे, ज्ञानचंद वाधवानी, हरिश पारवानी, रामचंद्र कुंकरेजा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. खदान पोलिस ठाण्यात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना मदत करण्यासाठी सभा आयोजित केल्याने ज्येष्ठांचे चेहरे खुलले होते.
 
आपण समाजाचे देणे लागतो, या उदात्त भावनेतून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच गुन्हेगारीकडे मुले वळूच नयेत याकडे थोडे का होईना लक्ष दिल्यास, त्याचा समाजाला फायदा होईल आणि पोलिसांप्रती एक चांगला संदेश जाईल.
 
स्मार्ट पोलिस ठाणे उपक्रमाचाच एक भाग
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्मार्ट पोलिस ठाणे बनवण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक आणि पोलिसिंगवर आमचा भर आहे. ज्येष्ठांच्या समस्या आदरपूर्वक समजून घेत त्यांच्या मनात पोलिसांविषयी आपुलकी निर्माण व्हावी समाजात पोलिसांप्रती चांगली भावना निर्माण व्हावी हा प्रयत्न आहे. गजाननशेळके, ठाणेदार खदान पोलिस ठाणे.
बातम्या आणखी आहेत...