आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या ‘व्हीसी’मध्येही चर्चेला आला सामाजिक भवनाचा मुद्दा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सामाजिक न्याय भवनाच्या मुद्द्यावर शासनही गंभीर असून हा मुद्दा अलीकडेच पार पडलेल्या समाजकल्याण मंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही (व्हीसी) चर्चीला गेला. बायपासवरील ट्रव्हल स्टँडच्या समोर प्रस्तावित पोलिस वसाहतीला लागून नीमवाडी परिसरात हे भवन तयार होणार आहे. 
 
सदर जागेची मोजणी फी भरली नाही, म्हणून जागा हस्तांतरीत झाली नाही, असे भूमी अभीलेख खात्याचे म्हणणे होते. तर मोजणीसाठी नेमकी किती रक्कम भरायची, हेच कळविले नसल्याने जागा ताब्यात घ्यायची कशी, असा सामािजक न्याय विभागाचा प्रश्न होता. दोन विभागातील या असमन्वयावर बोट ठेवत ‘दिव्य मराठी’ने हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर प्रारंभी जिल्हािधकाऱ्यांनी आणि आता थेट मंत्र्यांनीच विचारणा करुन न्याय भवनाच्या निर्मितीचा आढावा घेतला. 

सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीसाठी जानेवारी २०१७ मध्येच नीमवाडीतील हजार ९३८ चौरस मीटर शासकीय जागा मंजूर करण्यात आली आहे. मौजे अकोला, नझूल शीट क्रमांक ४३ प्लॉट क्रमांक बाय आणि बाय मधिल या जागेसाठीचा आदेश २१ जानेवारी रोजीच पारीत झाला. या शासकीय जागेची मोजणी करुन ती समाजकल्याणने आपल्या ताब्यात घ्यावी, असे त्या आदेशात म्हटले होते. परंतु दोन खात्यांमध्ये सुरु झालेल्या पत्रद्वंदामुळे हा विषय अडचणीत आला होता. 

तसे झाले नसते तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असलेल्या एप्रिल महिन्यातच सामािजक न्याय भवनाचे भूमीपूजन उरकले असते. त्यामुळेच भूमी अभीलेख खात्याने सूचविलेल्या मोजणी फीनुसार तुम्ही रक्कम केव्हा भरता, असा थेट प्रश्न जिल्हािधकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेल्या आठवड्यातच समाज कल्याणला विचारला होता. 

सर्व विभाग येणार एकाच छताखाली 
^सामाजिक न्यायभवन झाल्यानंतर समाज कल्याणचे सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. माझ्या कार्यालयासह जात पडताळणी विभाग, समाजकल्याणला पुरक असलेली विविध आर्थिक विकास महामंडळांची कार्यालयेही याच इमारतीत स्थापन होणार आहेत. यावलीकर,सहायक आयुक्त, समाजकल्याण अकोला. 
 
बातम्या आणखी आहेत...