आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

"सामाजिक वनीकरण' वितरित करणार २५० जलपात्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - २० मार्च हा दिवस "जागतिक चिमणी दिवस' म्हणून जगभरात साजरा केला जातो. दिवसेंदिवस चिमण्यांचे प्रमाण कमी होत असून, "चिमणी वाचवा'चा संदेश देण्यासाठी २०१० पासून संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सामाजिक वनीकरण विभागातर्फे २५० जलपात्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

चिमण्यांचे अस्तित्व टिकून ठेवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जात आहे. जगभरात सध्या चिमणीच्या एक हजार २०० प्रजाती असून, ८७ प्रजाती या संकटग्रस्त आहेत. फ्रान्स येथील इकोसिस अॅक्शन फाउंडेशनतर्फे नेचर फॉर एव्हरी सोसायटीअंतर्गत पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता. तसेच "चिमणी वाचवा'चा संदेश देण्यासाठी गुजरात सरकारतर्फे २०१३ मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली सरकारने २०१२ मध्ये चिमणीला दिल्लीचा राज्य पक्षी म्हणून घोषित केले होते. चिमणी वाचवण्यासाठी जगभरातून प्रयत्न केला जात आहे. जागतिक चिमणी दिवसानिमित्त अकोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसानिमित्त सामाजिक वनीकरण विभागातर्फे २५० जलपात्रांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये सार्वजनिक ठिकाणी स्टॉल्स लावून नागरिकांना या जलपात्रांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती विभागाचे जनसंपर्क अधिकारी गोविंद पांडे यांनी दिली. न्यू ईरा शाळेत मार्गदर्शन कार्यक्रमापासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता न्यू ईरा शाळेत वनीकरण विभागाचे अधिकारी पांडे हे विद्यार्थ्यांना चिमणीसंदर्भात पर्यावरणबद्दल माहिती देऊन "चिमणी वाचवा'चा संदेश देणार आहेत. यासोबत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जलपात्रांचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र कन्या शाळेतही जलपात्रांचे वाटप केले जाणार आहे.

आदर्श पार्कमध्ये पक्षी छायाचित्र प्रदर्शन
जिल्ह्यातील विविध जलाशयांवर आढळलेल्या दुर्मिळ, इतर पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आदर्श पार्क येथे भरवण्यात येत आहेत. प्रा. मनीष शेटे यांची छायाचित्रे यात लावली जातील. येथे रविवारी सायंकाळी वाजता जलपात्रे कृत्रिम चिमणी घरट्यांचे मोफत वाटप केले जाणार आहेत. पक्षी संशोधक लक्ष्मीशंकर यादव यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...