आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकल्याण विभागाचे साहित्य गोदामातच पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हापरिषद समाजकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय शेतमजूर, शेतकरी, मागासवर्गीय, भटक्या जमाती, अनुसूचित जाती, जमातीमधील होतकरूंना वाटप करण्यात येणारे साहित्य सध्या पंचायत समिती स्तरावर गोदामाचे कल्याण करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून साहित्याचे वाटप होत नसल्याचा आरोप होत आहे. या वस्तू शंभर टक्के अनुदानावर मिळत असतात, तर समाजकल्याण विभागाचे कामही तीन वर्षांपासून प्रभारीच आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत गरीब होतकरू युवकांकरिता समाजकल्याण विभागाला साहित्य पुरवठा करण्यात येतो. लाभार्थ्यांचे अर्ज बोलावून त्यांना त्या प्रमाणात पंचायत समिती स्तरावरून साहित्याचे वाटप केल्या जाते. शंभर टक्के अनुदानावर असलेले हे साहित्य लाभार्थ्यांच्या उपयोगी पडणारे असते. हे साहित्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आवाजही उठवण्यात आला होता. परंतु, त्यापासून आश्वासनांपलीकडे काही होत नसल्याची स्थिती आहे. गोदामांमध्ये पडलेले साहित्य हे एक कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याकडे लक्ष पुरवण्याचे काम आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करावे लागणार आहे. कारण समाजकल्याण विभागाला कोणी वाली नाही.

सायकल, शिलाई मशीन, विद्युत मोटार, पॉवर स्प्रे, नॅकसॅक पंप, पिठाची चक्की आदी साहित्य वाटप होते. परंतु, तीन ते चार वर्षांपासून साहित्यच वाटप होत नसल्याचा आरोप होत आहे.
गोदाम ताब्यात घेण्याचा शिवसेनेने दिला इशारा

मागासवर्गीयांनासाहित्यापासून वंचित ठेवण्याचे काम जिल्हा परिषद करत आहे. येत्या पंधरा दिवसात जर लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप झाल्यास शिवसैनिक गोदाम ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अशोक इंगळे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.

समाजकल्याण अधिकारी पद रिक्त
समाजकल्याणअधिकारी या मुख्य पदांसह महत्त्वाचे अधीक्षकाचे पद रिक्त आहे. वरिष्ठ लिपिक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता हे अपंग विभागातील पदही रिक्त आहे.
सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्न उपस्थित

२०१२ते २०१५ या चार वर्षांत पंचायत समिती स्तरावर विद्युत मोटार, शिलाई मशीन, चक्की, पॉवर स्प्रे वाटप करण्यात आले नाही. वाटपाच्या नावाखाली दिशाभूल करणे सुरू आहे. सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. अशोकइंगळे, जि.प. विरोधीपक्षनेता.
बुलडाणा जिल्हा समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये साहित्य पडून आहे.

बातम्या आणखी आहेत...