आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृद तपासणी लॅबने १३ वर्षांपासून टिकवले ‘आयएसओ’, प्रयोगशाळेला मिळाले मानांकन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील नेहरू पार्क चौकस्थित मृद तपासणी प्रयोगशाळेने सतत १३ वर्षांपासून आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) प्रमाणपत्र टिकवून ठेवले आहे. अशाप्रकारचे मानांकन टिकवून ठेवणारे शहरातील बहुधा ते पहिलेच कार्यालय असून, राज्याच्या ‘अ’ वर्ग श्रेणीतील सात प्रयोगशाळांपैकी अख्ख्या विदर्भातील ती एकमेव प्रयोगशाळा आहे.
पाटबंधारे विभागामार्फत बांधली जाणारी धरणे, कालवे, बंधारे इमारतींसाठीचे साहित्य गुणवत्तेची कसोटी पूर्ण करते की नाही, ही तपासणी या ठिकाणी केली जाते. त्यासाठी लागणारी जुजबी यंत्रसामग्री कुशल तंत्रज्ञ या ठिकाणी असल्यामुळे सन २००३मध्ये आयएसओने सर्वप्रथम या कार्यालयाला मानांकन बहाल केले. त्याआधी तीन वर्षे या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यंत्रसामग्रीच्या कसोटी घेतल्या. दरम्यान, गुणवत्ता, वक्तशीरपणा, यंत्रसामग्रीची विशेष देखभाल, नागरिकांचे (ग्राहकांचे) समाधान आदी बाबी जपल्यामुळे या कार्यालयाचे मानांकन आजही कायम आहे.

हे आहेत मानकरी : याकार्यालयाला पहिल्यांदा मानांकन मिळवून दिले तेव्हा संजय बेलसरे हे कार्यकारी अभियंता होते. सन २००० मध्ये ते त्यांची चमू पहिल्यांदा पहिल्या तपासणीला सामोरी गेली. सध्या ही जबाबदारी विजय लोळे यांच्या खांद्यावर आहे. दरम्यानच्या काळात इंटरनल हाउसकीपिंगचे ऑडिट टेक्निकल ऑडिटर राम पाटील यांनी पूर्ण केले. अलीकडे २३-२४ मार्चला या कार्यालयाची तपासणी केली गेली. सहायक अभियंता (श्रेणी एक) ए. पी. गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनातच ती पूर्ण झाली. जानेवारी २०१६ पर्यंत या कार्यालयाचा कारभार एस. डी. पिंजरकर यांच्याकडे होता.

कसे दिले जाते आयएसओ मानांकन?
तीन महिन्यांनी इंटरनल हाउसकीपिंगचे ऑडिट करवून घ्यावे लागते. त्याचा आधार घेत महिन्यांनी आयएसओची चमू कार्यालयाची तपासणी करते. ही तपासणी निकषानुसार खरी ठरली की, तीन वर्षांनी सर्वेलियंस इंटरनल ऑडिट करवून घेण्यासोबतच नोंदणीची अटही संस्थेतर्फे घातली जाते. त्यानंतर कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळण्याचा मार्ग खुला होतो.

अानंदाची बाब
^माझ्या कार्यालयाला गेल्या १५ वर्षांपासून आयएसओ मानांकन मिळतेय, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या ठिकाणी १० ते १२ प्रकाराची कामे केली जातात. हे यश टिकवून ठेवतानाच भविष्यात त्याहीपेक्षा पुढच्या पायऱ्या चढण्याची तयारी करतो आहोत.'' ए. पी. गुल्हाणे, सहायकअभियंता (श्रेणी-एक).

या प्रयोगशाळेमार्फत मुरूम, माती, खडक, सीमेंट, रेती, खडी इत्यादी बांधकाम साहित्यांची तपासणी केली जाते. विदर्भातील ११ जिल्ह्यांसह लगतच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील काही जिल्हेही येथील सेवेचा लाभ घेतात. सहायक अभियंता श्रेणी एक ए. पी. गुल्हाणे हे या कार्यालयाचे प्रमुख आहेत.

काय आहे आयएसओ?
सोन्याची गुणवत्ता ठरवणारी हॉलमार्क, लोखंडासह गृहपयोगी इतर वस्तूंची गुणवत्ता ठरवणारी आयएसआय, अशाच प्रकारची कार्यालयांची गुणवत्ता ठरवणारी यंत्रणा म्हणजे आयएसओ आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये नागरिकांची सनद लावलेली असते. बरेचदा नागरिकांच्या वाट्याला विस्कळीतपणाच अधिक येतो. पण अशा स्थितीतही काही कार्यालये अत्यंत चपखलपणे नागरिकांच्या सनदीची काळजी घेतात. अमेरिकेच्या मिसीगन प्रांतात या संस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयाला पहिले प्रमाणपत्र मिळाले तेव्हा कार्ल ब्लॅझिक हे उपाध्यक्ष होते.
माती परीक्षण प्रयोगशाळेचा दर्शनी भाग.