आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायुक्तपदी सोळंकेंची वर्णी लागण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका उपायुक्तपदी बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांची बुधवारी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रालयातून सोळंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्षभरापासून उपायुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. त्यापैकी एका पदावर दयानंद चिंचोलीकर यांची नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचीही काही महिन्यांपूर्वीच बदली झाल्याने दोन्हीही पदे रिक्त झाली. मागील महिन्यात समाधान सोळंके यांची उपायुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. या फाइलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरीही झाली होती. मात्र, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे ही फाइल प्रलंबित होती. अखेर ती निकाली निघाल्याने उपायुक्तपदावर समाधान सोळंके यांची बुधवारी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.