आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासुरवाडीला आदर्श ग्राम बनवण्याचा जावयाने केला निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - निंभा येथील मनोहर देशमुख यांचे जावई जितेंद्र अंबास्ता टीसीएस कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनी आपल्या निंभा या सासुरवाडीला आदर्श ग्राम बनवण्याचा निर्धार करून ६० शेतकऱ्यांना घेऊन विदर्भ फार्मर्स क्लब स्थापन केला आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबवून विदर्भातील शेतकऱ्यांना विकासाचा मार्ग दाखवून त्यांनी प्रेरणावाट निर्माण केली आहे.
जावई केवळ घेतो, तुमच्या गावचा जावई द्यायला आला आहे, तुमचे गाव आदर्श बनवून घ्या, असा सल्ला ग्रामस्थांना खुद्द जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला आहे. निंभा येथे उपक्रमांतर्गत रविवार, २५ सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मनोहर देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर गाव आदर्श बनण्यापूर्वी आदर्श व्यक्ती निर्माण होण्याची गरज प्रतिपादीत करून स्वच्छता ठेवणारी व्यक्ती आदर्श मानल्या जाते हे गुपीत उघड करताना जी श्रीकांत यांनी शौचालये बांधण्याचा संकल्प करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.

देशमुख यांनी स्थापन केलेल्या विदर्भ फार्मर्स क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेवाळे, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाणे, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, सरपंच जयश्री देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुढीपाडव्यापर्यंत दिला ग्रामस्थांना अल्टिमेटम
गुढीपाडव्यापर्यंतचा अल्टिमेटम त्यासाठी त्यांनी दिला. १२ हजार रुपये शौचालय उभारणीसाठी पुरेसे आहेत, मी तर पाच हजारात उभे करून देतो, परंतु, पश्चिम विदर्भात स्वाभिमानच हरवल्याची खंत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली हात धुण्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले.
बातम्या आणखी आहेत...