आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणीचा वाद; भावानेच केला भावाचा घात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलेगाव - शेतीचावाद विकोपाला गेल्याने मोठ्या भावाने अंध लहान भावाची हत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील मळसूर येथे गुरुवारी रात्री घडली. शेतामध्ये पेरणी करण्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला आणि मोठ्या भावाने दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लहान भावाला राफ्टरने बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

उमळसूरयेथील जगदेव किसन कंकाळ वय ५२ आणि सुखदेव कंकाळ वय ५५ हे दोघे भाऊ मिळून पाच एकर शेती पाहायचे. मात्र, काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुखदेव हा अकोला येथे राहत असे, तर जगदेव मळसूर येथे वास्तव्यास होता. गुरुवार, २३ जुलै रोजी सुखदेव मळसूर येथे आला. त्याने या हंगामात शेतीचे काम आपणच पाहणार असल्याचे जगदेवला सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये रात्री साडेनऊ वाजता वाद झाला. सुखदेव दारूच्या नशेत होता. त्याने कोणताही विचार करता अंध असलेल्या जगदेवला राफ्टरने मारहाण केली. यामध्ये जगदेवच्या छाती पोटाला जबर मार बसला. त्यानंतर काही नातेवाइकांनी जगदेवला गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी सुखदेव कंकाळविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी त्याला पातूर न्यायालयात हजर केले सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालने साेमवार, २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

जगदेवला मिळाली नाही बायकांची साथ
जगदेवने आतापर्यंत चार बायका केल्या होत्या. मात्र, तो दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने त्याच्या चारही बायका नांदल्या नाहीत. दरम्यान, चारपैकी दुसऱ्या नंबरच्या पत्नीपासून त्याला एक मुलगी झाली. परंतु, त्या पत्नीनेही मुलगी झाल्यानंतर जगदेवच्या संसाराला रामराम ठोकला. या चिमुकलीचा सांभाळ जगदेवच्या बहिणीने केला. मात्र, आता जगदेवचा मृत्यू झाल्याने या मुलीच्या डोक्यावरील पित्याचे छत्रही हरवले आहे.
सुखदेव कंकाळ, आरोपी