आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसपींच्या पथकाचा छापा, १४.६२ लाखांचा गुटखा जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दगडीपूल रोडवरील जय रोडलाइन्स गोदामात पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी १४ लाख ६२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस व अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करत होते.

कपिलदेव कृपाशंकर पांडे (रा. कैलास टेकडी) यांनी त्यांच्या ट्रान्सपोर्ट गोडावूनमध्ये गुटखा साठवून ठेवल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली. त्यांनी या गोडावूनमधे होत असलेल्या हालचालीवर लक्ष ठेवले. मंगळवारी या गोडावूनमध्ये एका ट्रकमधून गुटखा आल्याची खात्री केल्यानंतर जाधव यांच्या पथकाने सायंकाळी गोडावूनवर छापा टाकला. या वेळी त्यांना राज्यात प्रतिबंधित असलेल्या बहार पान मसाला, तंबाखू, पान बहार मसाला गुटख्याचे पोते आढळून आले. पोलिसांनी हा गुटखा ताब्यात घेऊन कारवाई केली. गुटख्याच्या पोत्यावर केवळ अशोक अकोला असे लिहलेले होते. या नावावरून कारवाई करताना पोलिसांना अडचण निर्माण झाली होती. कारवाईची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर फौजदारी कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार करत होते.
बातम्या आणखी आहेत...