आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशकाचे बळी: विशेष तपास पथकाच्या समाेर अधिकाऱ्यांची हजेरी; बंदद्वार चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील कीटकनाशक बळी प्रकरणाची विशेष तपास पथकापुढे (एसअायटी) शुक्रवारी कृषि अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. पथकातील वरिष्ठांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केल्याचे समजते. एसअायटीने बंदद्वार केलेल्या चौकशीदरम्यान काही अधिकाऱ्यांची भांबेरी उडल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. याप्रकरणी चाैकशीसाठी गठित केलेले विशेष तपास पथक अकाेेल्यातील प्रकरणांची चाैकशी करणार नव्हते. ही बाब दै. दिव्य मराठी प्रथम उजेडात अाणली हाेती. त्यानंतर सर्वचस्तरारुन जिल्ह्यातील प्रकरणांची एसअायटीतर्फे चाैकशी व्हावी, अशी मागणी झाली हाेती.
 
जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणीतून विषबाधेमुळे सात शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, अनियमिततेमुळे १४ काेटींचे कीटकनाशक विक्री बंदचे अादेश कृषि विभागाने बजावले हाेते. यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक बळीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापण्याचा निर्णय शासनाने घेतला हाेता. त्यानुसार विभागीय अायुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय पथक स्थापन केले. त्यानंतर एसअायटीची कार्यकक्षा वाढवत अकाेल्यातही बळींप्रकरणाच्या चाैकशीचा निर्णय एसअायटी प्रमुख असलेल्या विभागीय अायुक्तांनी घेतला हाेता.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात झाली चाैकशी : एसअायटीमध्येविभागीय आयुक्त पीयुष सिंह (पथक प्रमुख) , सदस्य विशेष पोलिस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन नाईकवाडे, कृषी विदयापीठाचे डॉ. डी.बी. उंदिरवाडे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक विजय वाघमारे, फरिदाबादच्या डायरेक्टोरेट ऑफ प्लान्ट प्रोटेक्शन, क्वारेनटाईन ॲन्ड स्टोरेजचे के. डब्ल्यू. देशकार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे समावेश हाेता. . एसअायटीने जिल्हाधिकारी कार्यालयात चाैकशी केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, जि. प.चे कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदेंसह काही अधिकारी उपस्थित हाेते. एसअायटीने गोपनीय चाैकशी केली. या प्रकरणाशी संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांना चौकशीच्या कक्षात उपस्थित राहू दिले नाही.
 
फुकट कुटुंबीयांकडून जाणून घेतला घटनाक्रम : कीटकनाशकफवारणीने विषबाधा होऊन मृत्यू झालेले आगरचे शेतमजूर राजेश मनोहर फुकट यांच्या कुटुंबियांची एसअायटीने घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी घटना कशी घडली, काेणाच्या शेतात फवारणी केली हाेती, काेणते कीटकनाशक हाेते, अादी माहिती घेतली. राजेश फुकट यांना फवारणीतून विषबाधा झाल्याने त्यांना १६ सप्टेंबरला सर्वेापचार रुग्णालयात भरती केले हाेते. प्रकृति बिघडल्याने त्यांना २० सप्टेंबरला खासगी रुग्णालयात हलवले. तेथेही त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना २७ नोव्हेंबरला नागपूरच्या खासगी रुग्णालयात नेेले. मात्र अाॅक्टाेबरला त्यांचा मृत्यू झाला हाेता. ही बाब प्रथम दैनिक दिव्य मराठीने उजेडात अाणली हाेती.
 
बाधित झालेल्या शेतकऱ्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचापूस
एसअायटीने विषबाधित शेतकऱ्यांची सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भेट घेऊन चौकशी केली. तसेच शेतकऱ्यांवरील उपचाराबाबतची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. पथकाने अाैषधींची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तहसीलदार राजेश्वर हांडे अादी उपस्थित होते.
 
....यांचे दणाणले धाबे
कीटकनाशकबळीची एसअायटीने चाैकशी केल्याने काही कृषि केंद्र, कंपन्या अाणि संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले अाहे. एसअायटी विना परवाना किटकनाशकांची झालेली विक्री, केलेली कार्यवाही, नमुने प्रमाणित आढळून अालेल्या प्रकरणांची विश्लेषण करणार अाहे. त्यानुसार पथक शिफारस करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. अकोल्यात विना परवाना विना नाेंदणी असलेली काेटी लाख रुपयांची कीटकनाशके कृषि विभागाच्या तपासणीत आढळून अाली हाेती, हे येथे उल्लेखनीय.
 
...तर अधिकाऱ्यांवर होऊ शकते कारवाई
यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या कीटकनाशक बळी प्रकरणी जिल्हा कृषि विकास अधिकाऱ्यास निलंबित करण्यात अाले हाेते. त्यानंतर कृषि विक्रेते कंपन्यांवर गुन्हेही दाखल करण्यात अाले हाेते. अाता अकाेल्यातील प्रकरणांची एसआयटी चाैकशी प्रारंभ झाल्याने काही अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली अाहे.
बातम्या आणखी आहेत...