आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतेडी बुद्रुक येथील दिंडीचे बुलडाण्यात स्वागत, भाविकांनी घेतले पालखीचे मनोभावे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - हातातटाळ वीणा, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी गण गण गणात बोतेचा गजर करीत पावसाची तमा बाळगता दरकोस दर मुक्काम करीत आज ९ ऑगष्ट रोजी हतेडी बुद्रूक येथील पायदळ दिंडीने संत नगरी शेगावकडे प्रस्थान केले. या दिंडीचे बुलडाणा शहरात आगमन झाले असता अनेक भाविकांनी पालखीचे स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले. या पायदळी दिंडीत मोठया संख्येने महिला भाविकांनी सहभाग घेतला आहे. 
 
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चतुर्थी निमित्त हतेडी बुद्रूक येथील श्री भक्तांच्या वतीने पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त तहसीलदार रामनाथ दळवी, सांडु घट्टे, हरिभाऊ जाधव आत्माराम जाधव हे पायदळ दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. दरम्यान आज सकाळी अकरा वाजता हतेडी बुद्रूक येथून पायदळ दिंडीने प्रस्थान केले. दुपारी ही पायदळ दिंडी बुलडाणा शहरात अाली असता भाविकांनी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले. या दिंडीमुळे शहरात मंगलमय वातावरण पसरले होते. आज संध्याकाळी या पायदळ दिंडीचा मुक्काम वरवंड फाट्यावर होणार आहे. त्यानंतर उद्या १० ऑगष्ट रोजी सकाळी ही पायदळ दिंडी संत नगरी शेगावकडे प्रस्थान करणार आहे. संतनगरीत जावून श्रींचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या दिंडीत नारायण पाटील, संजय जाधव, विश्वनाथ जाधव, रामेश्वर जाधव, सागर जाधव, अमोल जाधव गणेश तायडे आदी भाविक सहभागी झाले आहेत. 
 
महिलांचा सहभाग 
बुलडाणा तालुक्यातील हतेडी बुद्रूक येथून निघालेल्या पायदळ दिंडीत मोठ्या संख्येने महिला भाविकांचा सहभाग होता. पायदळ दिंडीत महिला हरिनामाचा गजर करीत होत्या. 
बातम्या आणखी आहेत...