आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंद्यावर आता विशेष पोलिस महानिरीक्षकांची नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अवैध धंद्याच्या बाबतीत कारवाईत कसूर होत असेल, तर विशेष पथकाकडून छापेमार कारवाई करण्याचा प्रस्ताव अमरावतीचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव अंमलात आणण्यास भाग पाडणाऱ्यांची गय गेल्या जाणार नाही, अशी कणखर भूमिका डॉ. विठ्ठल जाधव यांनी दिव्य मराठीशी बोलताना मांडली.

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून डॉ. विठ्ठल जाधव यांची नियुक्ती झाली तेव्हापासून पोलिसींग सोबतच एक सामाजिक सर्व धर्माचा आदर करणारे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून ते अल्पावधीतच परिचित झाले आहे. सामाजिक जीवनात त्यांचा जास्त वावर असल्यामुळे जी माहिती त्यांना त्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळणे शक्य नाही. ती माहिती त्यांना समाजातील प्रतिष्ठितांकडून माध्यमांकडून मिळत आहे. डॉ. विठ्ठल जाधव यांनी विभागातील सर्वच जिल्ह्यात जातीय सलोखा संमेलने घेतली. या संमेलनाच्या माध्यमातून विविध समाज घटक त्यांच्याशी जुळल्या गेला. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभारी अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल. तर अशा ठिकाणी थेट विशेष पथकाद्वारे छापे टाकण्याची कारवाई होणार आहे. त्यात अकोल्यासह विभागातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश आहे. कारवाई झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित आहे.

एलसीबी प्रमुखांची घेतली मीटिंग
स्थानिकगुन्हे शाखेचा दबदबा पहिल्यासारखा राहिला नाही यावर विशेष पोलिस महासंचालक डॉॅ. विठ्ठल जाधव यांना विचारले असता नुकतीच आपण स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे ते म्हणाले. या बैठकीत त्यांना कारवाया करण्याचे टार्गेट देण्यात आले.

सहा ठाणेदारांची घेतली रविवारी बैठक
शहरातीलतीन तर ग्रामीण मधील तीन पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांना विशेष पोलिस महानिरीक्षकांनी रविवारी बोलावले होते. यावेळी त्यांना सूचना देण्यात आल्या. अशाच बैठका आता वारंवार घेण्यात येणार असल्यामुळे जिल्ह्यातील ठाणेदारांनी या बैठकीची धास्ती घेतल्याची माहिती आहे.

विशेष पथक एलसीबीवर नाराजी
जिल्ह्यात कारवाया करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशाेर मीणा यांनी विशेष पथक गठित केले. मात्र या पथकाचा उद्देश साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. जुगार आणि अवैध दारू विक्रीच्या कारवायांपलिकडे हा विभाग जात नसल्याचे वास्तव आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे किडनी तस्करी कारवाईपासून एकही धमाकेदार कारवाई या पथकाने केली नाही. त्यामुळे या पथकाचा दबदबाच राहिला नसल्यामुळे या दोन्ही पोलिस यंत्रणाच्या कामगिरीवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...