आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित व्यायाम केल्याने वाढते हृदयाची कार्यक्षमता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशात युवावस्थेत हृदय रोगाचे प्रमाण फार झपाट्याने वाढत असून, यावर विचार होणे गरजेचे झाले आहे. नियमित व्यायाम संतुलित आहार, दिनचर्या हाच एकमेव उपाय असून, त्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते, असे प्रतिपादन प्रतिपादन नागपूर येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद मुंदडा यांनी केले. सिव्हील लाईन येथील आयएमए सभागृहात २५ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिनानिमित्त त्यांचे व्याख्यान झाले.

इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), ओझोन हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद मुंदडा यांचे ‘सुनो दिलसे दिल की बात’ या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. डॉ. मुंदडा यांनी पॉवर पॉइंटद्वारे हृदयाची त्याच्या रोगांची माहिती दिली. हृदय हे एक प्रकारे आपल्या शरीर रूपी वाहनाचे इंजिन आहे. ज्या प्रमाणे वाहनाच्या इंजिनाला इंधनाची गरज असते तशीच गरज हृदयाला प्राणवायूची असते, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणीया, डॉ. किशोर पाचकोर, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रांत पदाधिकारी चौथमल सारडा, ओझोन हॉस्पिटलचे डॉ. निलेश कोरडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला डॉ. प्रदीप अग्रवाल, कमल लढ्ढा, राम हेडा, डॉ. पोफळकर, डॉ. रुहाटिया, डॉ. अभय जैन, डॉ. संदीप चांडक, डॉ. अनुराग गुप्ता, डॉ. महेश गांधी, डॉ. शिल्पा चिराणीया, डॉ. स्मिता कोरडे, डॉ. सतीश परदेशी, डॉ. वैशाली श्रीनाथ, डॉ. कोमल मोरे, डॉ. नमिल खान, पारेख पुरुषोत्तम बगडिया, अर्चना शिरसाट, रईस पटेल, विलास राजगुरू, उदय भटकर, विष्णू खंडेलवाल, ब्रिजमोहन चितलांगे, शैलेंद्र कागलीवाल, प्रभाकर पाटणकर, विनायकराव बोराडे यांच्यासह आयएमए, ओझोन हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...