आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speed Bus Stop , He Donate Life To 50 Passengers

धावती बस थांबवून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकाम्त्‍मक छायाचित्रत् - Divya Marathi
प्रतिकाम्त्‍मक छायाचित्रत्
अकोला; राष्ट्रीयमहामार्गावर व्याळानजीक बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. धावत्या बसमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही त्या बसचालकाने बस थांबवली. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी वाजता घडली.
अकोला आगार क्रमांक ची अकोला-बुलडाणा ही बस अकोला बसस्थानकावरून प्रवासी घेऊन अडीच वाजता चालक यू. जी. रोम निघाले. अचानक त्यांना व्याळाजवळ छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांनी प्रसंगावधान साधत बस रस्त्याच्या कडेला घेतली. दोन मिनिटांतच त्यांनी अखेरचा श्वास घेत ५० प्रवाशांना जीवदान दिले. रोम हे उमरी अकोला येथील रहिवासी आहेत. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

प्रवाशांनाही अश्रू अनावर
राष्ट्रीयमहामार्गावर व्याळानजीक बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांतच त्यांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहत असतानाच प्रवाशांना रडू कोसळले.