आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक सलोख्यासाठी धावले पोलिस, नागरिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- क्रीडा स्पर्धेनिमित्त शनिवारी सकाळी ६.३० वाजता पोलिस प्रशासनातर्फे आयोजित सामाजिक एकता दौडला चांगला प्रतिसाद मिळाला. पोलिस विभागातर्फे गुरुवारपासून जिल्ह्यातील पोलिसांसाठी क्रीडा स्पर्धा घेतल्या. 

या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमापूर्वी पोलिस विभागातर्फे सर्व समाज, धर्मांच्या नागरिकांचा सहभाग असावा, यादृष्टीने सामाजिक एकता दौडचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. सामाजिक सलोख्याचा आधार घेऊन पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतात. अशा कार्यक्रमांत सर्व जाती, धर्माच्या नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी स्पर्धा घेतली.त्यानिमित्त पोलिस दलातर्फे एकता दौडचे आयोजन केले होते. यात शांतता समिती सदस्य, पोलिस मित्रांसह मान्यवर सहभागी झाले. 

एकतादौडमध्ये यांनी मारली बाजी : सामाजिकएकता दौडमध्ये पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून प्रथम राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके, द्वितीय रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, तृतीय पोलिस उपअधीक्षक राहूल धस यांना, ज्येष्ठ नागरिकांमधून प्रथम अशोक देशमुख, द्वितीय राजेंद्र बडेरे, तृतीय अशोक पांडे, पत्रकारांमधून प्रथम बंटी नांदूरकर, द्वितीय अनुराग अभंग, तृतीय दीपक शर्मा. विद्यार्थी गटात आशिष सपकाळ, किशोर खडसे, उमेश उंबरकर, शाहीद खान, इस्माइल खान यांना पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

२०० ४०० मीटर धावणाऱ्यात पोलिस मुख्यालयातील सागर देशमुख यांनी प्रथम क्रमांक घेतला. ८०० , १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत संदीप यांनी प्रथम क्रमांक घेतला. ११० मीटर अडथळा स्पर्धेत इरफान खान यांनी विजय मिळवला. ४१०० मीटर स्पर्धेत सागर देशमुख यांनी प्रथम क्रमांक प्रात केला. लांब, उंच, तिहेरी उडीत इमरान खान यांनी विजेतेपद मिळवले. गोळाफेकमध्ये कैलास यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भालाफेकमध्ये सुरेश यांनी, थाळीफेकमध्ये जावेद खान यांनी वरील एकल गटात विजयश्री प्राप्त केली. फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, हँडबॉल या स्पर्धांत पोलिस मुख्यालय संघाने प्रथम विजेतेपद मिळवले. शहर विभागास दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याहस्ते गौरवले. यावेळी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...