आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसुतीकालीन रजा वाढीचा साखर वाटून आनंदोत्सव, एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रसुतीकालीन रजेच्या कालखंडात वाढ करण्याच्या निर्णयाचा एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना साखर वाटून आनंद साजरा केला. एस. टी. कामगार संघटनेच्या नेत्या तथा निर्भया समितीच्या प्रदेश सचिव सविता नागवंशी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी एस. टी. स्टँडवर हा उपक्रम राबविण्यात आला. 
 
राज्य शासनाने अलीकडेच राज्य परिवहन महामंडळातील महिलांच्या हितार्थ रजा वाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पूर्वी सहा महिन्यापर्यंत असलेली प्रसुतीकालीन रजा दीडपट वाढवून नऊ महिने करण्यात आली आहे. या वाढीव कालखंडामुळे वाहक इतर महिला कर्मचाऱ्यांना प्रसुतीकालीन उपचार नवजात बालकांचे संगोपन अधिक उत्तमरित्या करता येणार आहे. यावेळी नागवंशी यांच्यासह संघटनेच्या अकोला विभागाच्या उपाध्यक्ष रुपाली वनकर, वेगवेगळ्या डेपोशी संलग्न वाहक प्रिती खुंटे, उज्वला लासुरकर, रजनी सावळे, बबीता मोरे, रजनी तायडे, रीता पाटील, सीमा यादव, जयश्री मसराम, वर्षा खंडाळकर, कल्पना खंडारे बावणे तथा विभाग नियंत्रक कार्यालयाच्या लिपीक कविता पळसपगार आदी उपस्थित होत्या. 
 
कामगार संघटनेची जुनीच मागणी 
महिलाकामगारांच्या प्रसुतीकालीन रजेत वाढ व्हावी, अशी मागणी म. रा. एस. टी. कामगार संघटनेने फार पूर्वीपासूनच केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून या मागणीसाठी संघटनेने सतत संघर्ष केला आहे. आठवडाभरापूर्वीच ही मागणी मान्य झाल्यामुळे संघटनेतील पदािधकारी-कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आनंद साजरा केला आहे.
बातम्या आणखी आहेत...