आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप; आजपासून थांबणार चाके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एेन दिवाळीच्या तोंडावर एस.टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे उद्या, मंगळवारपासून बस प्रवासाचे वांधे होणार अाहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिली आहे. 
 
एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांसह आस्थापना विभागातील लिपीकही या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह सर्वच ठिकाणचा बस प्रवास अडचणीत आला असून दिवाळीसाठी गावातून शहरात जाणाऱ्या ग्रामीणांना या आंदोलनाचा मोठा फटका बसणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांनी संयुक्तपणे या आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून फार पूर्वीच या आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती’च्या नावाखाली हे आंदोलन केले जात असून मागण्या मान्य होईस्तोवर माघार घ्यायची नाही, असा संबंधितांचा संकल्प आहे. 
 
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीशिवाय वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी द्या, खासगी बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करा, चालक-कम-वाहक संकल्पना रद्द करा, आदी मागण्याही सदर आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव अरविंद जहागीरदार, अध्यक्ष के. एस. चांदूरकर, डेपो अध्यक्ष राजीक देशमुख, कार्याध्यक्ष प्रदीप गावंडे, सचिन हाताळकर आदी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...