आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची दुचाकीला धडक; चिमुकला ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरळ - राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक सहा वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास निंबा फाटा ते शेगाव मार्गावरील लोहारा गावाजवळ घडली. सार्थक प्रमोद माहोकार (वय ६) रा. नया अंदुरा असे या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव असून, डॉ. प्रमोद माहोकार हे गंभीर जखमी झाले आहेत.

नया अंदुरा येथून डॉ. प्रमोद माहोकार, त्यांची पत्नी राजश्री, मुलगी प्रेरणा मुलगा सार्थक हे एमएच ३० एएच ७३२४ या क्रमांकाच्या दुचाकीने शेगावकडे जात हाेते. दरम्यान, शेगावहून तेल्हाऱ्याकडे जाणाऱ्या एमएच ४० वाय ५७१३ या क्रमांकाच्या एसटीने त्यांच्या दुचाकीला लोहारा गावाजवळ धडक दिली. या घटनेत सार्थक माहोकार हा घटनास्थळीच ठार झाला, तर प्रमोद माहोकार हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांची पत्नी मुलगीसुद्धा जखमी झाली आहे. जखमींना उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले. याप्रकरणी उरळ पोलिसांनी बसचालक अरुण त्र्यंबक चारघर रा. अकोला यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला एसटी उरळ पोलिस ठाण्यात जमा केली. याप्रकरणी जमादार गजानन ढोणे, पोलिस कान्स्टेबल राम अांबेकर, गणेश गावंडे, संजय वानखडे तपास करत आहेत.