आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता एसटीची अकोला ते पुणे सेमीस्लीपर, परिवहन महामंडळाने घेतला पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलाते पुण्याचा प्रवास आता निम लक्झरी झाला आहे. त्यासाठी परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला असून, अकोला आगार क्रमांक च्या वतीने अकोला ते पुणे प्रवासासाठी सेमी स्लीपर बसेस रविवार, डिसेंबरपासून सुरू केल्या आहेत. प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. अकोला आगार येथून सायंकाळी वाजता पुणेसाठी ही बस उपलब्ध राहणार आहे.

प्रवाशांना प्रवासादरम्यान, होणारा त्रास लक्षात घेता ही सुविधा सुरू केली आहे. बसमध्ये एअर सस्पेंशनसोबत पुश बॅक सीट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे. बसचे स्वरूप बदलता फक्त आरामदायी प्रवासासाठी सीटमध्ये बदल केले आहेत. यामधील सीट ह्या प्रवाशांच्या सोयीनुसार मागे पुढे करता येऊ शकतात. खासगी बस सेवांमध्ये वेळोवेळी भाडे वाढ केली जाते. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटकाही बसतो. मात्र, या बसेससाठी परिवहन मंडळाद्वारे ७३१ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. महामंडळाने एक दिवसीय सेवेमध्ये १,००० किलोमीटरच्या प्रवासात ३० हजारांचा नफा कमावल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बसेस पुणेच्या दापोडी वर्कशॉप येथून अकोल्यात दाखल झाल्या आहेत. यापूर्वीसुद्धा महामंंडळाने सेमी लक्झरी बसेस सुरू केल्या होत्या. मात्र, त्याला नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने त्या बसेस लाल रंगाच्या बसेसमध्ये बदलण्यात आल्या. त्याचा उपयोग ऑर्डिनरी बस म्हणून केल्या जात आहे. निम लक्झरी बसेसची मागणी ही दिवाळीपूर्वी केली होती. जी दिवाळीनंतर पूर्ण करण्यात आली. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेस यंत्र अभियंता संजय रामटेके यांनी उपलब्ध केल्या आहेत. बसेसचे आरक्षण ऑनलाइन किंवा बसस्थानकाच्या आरक्षण विभागात सकाळी ते या वेळेत करण्यात आले आहे. आरक्षण किमान एक दिवसापूर्वी करण्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सध्या बसेस रात्रीच्या प्रवासासाठीच उपलब्ध आहेत. मात्र, मागणी वाढली, तर प्रवाशांसाठी ही सुविधा सकाळीही सुरू करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले. अकोल्यातून ही बस सायंकाळी वाजता पुण्यासाठी निघेल. तीच बस पुणे येथून सायंकाळी ७.१५ वाजता अकोल्यासाठी निघेल. प्रवाशांचा प्रतिसाद बघताच नाशिक, हैद्राबाद, नागपूर या मार्गांवरसुद्धा अशाप्रकारची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येईल, असे विभागीय नियंत्रक अधिकारी सचिन क्षीरसागर यांनी सांगितले. सेवेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.

कमी भाड्यात सुविधा देण्याचा प्रयत्न
खासगीलक्झरीसेवांपेक्षा प्रवाशांना कमी भाड्यात सोयीस्कर सेवा तसेच सुरक्षित प्रवास देण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे. जास्त अंतर असतानाही आरामदायी प्रवास हा या योजनेचा हेतू आहे. प्रवाशांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिजित कोरटकर, आगारव्यवस्थापक अकोला.

बातम्या आणखी आहेत...