आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभापतींनी थाटले व्हरांड्यात कार्यालय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना कक्ष मिळाल्याने अखेर त्यांनी १७ मार्चला सायंकाळी स्थायी समिती सभागृहाच्या व्हरांड्यातच कार्यालय थाटले. महापालिका अस्तित्वात आल्यापासून सभापतींना कार्यालय मिळण्याची ही पहिलीच घटना असून, सभापतींना कक्ष मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दगडी इमारतीत स्थायी समितीचे सभागृह तसेच सभापतींचे कार्यालय, सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेत्याचे कार्यालय आहे. सभागृह नेता आणि विरोधी पक्ष नेत्यांचे कार्यालय १५ वर्षांत बदलले. मात्र, स्थायी समिती सभापतींचे कार्यालय एकाच ठिकाणी होते. मात्र, तीन वर्षांपासून स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने सभापतींचे कार्यालय रिकामे होते. या कार्यालयात विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी कार्यालय सुरू केले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सभापतींचा कक्ष विरोधी पक्षनेत्यांना देताना स्थायी समितीचा गुंता सुटल्यानंतर सभापतींसाठी हा कक्ष रिकामा करून देण्याचा तोंडी करार झाला होता, तर असा कोणताही करार झाला नसल्याचे विरोधी पक्षनेता साजिद खान म्हणणे आहे.

१२ मार्चला सभापतींची निवड झाल्यानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी आयुक्तांकडे वाहन, स्वीय सहायक आणि कक्षासाठी अर्ज दिला होता. त्यांना वाहन स्वीय सहायक उपलब्ध झाले. मात्र, कार्यालयाचा प्रश्न निकाली लागला नाही. यादरम्यान, मुंबई दौऱ्यावर गेलेले आयुक्त अजय लहाने गुरुवारी रुजू झाल्यानंतर ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला. विजय अग्रवाल आणि आयुक्तांमध्ये चर्चाही झाली. मात्र, प्रश्न निकाली निघाल्याने अखेर विजय अग्रवाल यांनी स्थायी समिती सभागृहाच्या व्हरांड्यात कार्यालय सुरू केले. शुक्रवारी अंदाज पत्रकावर चर्चेसाठी स्थायी समितीची सभा आहे. मात्र, व्हरांड्यातच समिती सदस्य, नगरसेवक अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागणार आहे.

एकमेव महापालिका : तीनवर्षे स्थायी समिती नसलेली तसेच प्रभाग समिती नसलेली राज्यातील एकमेव अकोला महापालिका ठरली होती. आता स्थायी समिती अस्तित्वात आली, मात्र, या समितीच्या सभापतींना कार्यालय नसलेली ही एकमेव महापालिका ठरली आहे.

तोडग्याचा प्रयत्न
^पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाबत यापूर्वी कोणताही ठराव झालेला नाही. मात्र, सभापतींच्या कार्यालयाचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. तोडगा लवकर निघेल.'' अजय लहाने, आयुक्त,मनपा.
बातम्या आणखी आहेत...