आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Standing Committee Members Selection Hearing On 26 September

‘स्थायी’ची सुनावणी नागपूर खंडपीठात २६ सप्टेंबरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्थायी समिती सदस्य निवड प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २४ सप्टेंबरला सुनावणी होत आहे. या सुनावणीदरम्यान महापौर आपली बाजू दाखल करणार की पुन्हा बाजू दाखल करण्यासाठी वेळ मागणार, याबाबत स्थायी समिती सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्थायी समिती सदस्य निवडीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. परिणामी, दोन वर्ष स्थायी समिती अस्तित्वात येऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिल्यानंतर स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला. १६ स्थायी समिती सदस्यांची निवडही करण्यात आली. परंतु, ही निवड नियमाला फाटा देऊन करण्यात आली.त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

या प्रकरणात आतापर्यंत अनेक वेळा सुनावणीच्या तारखा निश्चित झाल्या. परंतु, प्रत्येक वेळी महापौरांच्या विधिज्ञांनी बाजू मांडण्यासाठी अवधी मागितला. त्यामुळे प्रकरणात सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.

या आधी या प्रकरणात ११ सप्टेंबरला सुनावणी होती. महापौरांच्या विधिज्ञांनी बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला. त्यामुळे या प्रकरणात आता २४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. महापौरांनी २४ सप्टेंबरला बाजू सादर केल्यास सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारामुळे स्थायी समिती सभापतीची निवड रखडली आहे. पुढील वर्षी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक असल्याने स्थायी समिती सभापतीला काही संधी मिळणार की नाही? अशी चर्चाही या निमित्ताने सुरू आहे.

स्थायी समिती अस्तित्वात येण्यास विलंब होत असल्याने स्थायी समिती सदस्यांमध्येही धुसफूस सुरू असून, यामुळे अंतर्गत कलहात वाढ होत आहे. आता सुनावणीदरम्यान काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.