आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे हे स्टार body builder असतील येथील दहीहंडीचे खास आकर्षण- पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीम मारतांना संग्राम चौगुले. - Divya Marathi
जीम मारतांना संग्राम चौगुले.
मंगरुळपीर- राजे संभाजी व्यायामशाळा आणि मित्रमंडळातर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले, किशोर डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्या यात्रा मैदानावर गुरुवार, २५ ऑगस्टला सायंकाळी वाजता दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शहरामध्ये गोपालकाला निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दहिहंडी कार्यक्रम देखील त्याचाच एक भाग आहे. सन २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत जागतिक विजेता ठरलेले संग्राम चौगुले, तसेच भारत श्री म्हणून गौरवण्यात आलेले किशोर डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची शहरवासियांना उत्सूकता आहे. उत्तम तयारी करण्यात येत आहे. या प्रसंगी मान्यवरांचे मार्गदर्शनही होणार आहे.

दरम्यान याप्रसंगी मंगेश भेेंडकर अमरावती, शिवा कोसे सावनेर, रविकांत पाटील शेगाव, सोनू वाटमारे बार्शिटाकळी, संजय काकळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. येथील दहिहंडी उत्सवाला जुनी परंपरा आहे. गावामध्ये या निमित्त उत्सवाचे धडाक्यात आयोजन करण्यात येत असते. बालगोपालांचा या मध्ये चांगला सहभाग असतो. यंदा दहिहंडी साजरी करण्यासाठी उत्तम तयारी करण्यात आल्याचे दिसत आहे. दहिहंडी तसेच या निमित्त होणाऱ्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला जास्तीतजास्त युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजे संभाजी व्यायाम शाळेचे संचालक पंकज परळीकर यांनी केले आहे.

यांची प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी मंगेश भेेंडकर अमरावती, शिवा कोसे सावनेर, रविकांत पाटील शेगाव, सोनू वाटमारे बार्शिटाकळी, संजय काकळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या बॉडी बिल्डर्सचे खास Photos, ज्यांना पाहताच चांगल्या चांगल्यांना फुटतो घाम...
बातम्या आणखी आहेत...