आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू, साथीचा धोका वाढलाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पावसाळा लागला नाही ताेच, डेंग्यूचा धोका वाढला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात तीन बालके डेंग्यूमुळे बाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान डेंग्यूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होतो. पावसाळ्याची सुरुवात होत नाही तोच, डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ निर्माण झाली आहे. अकोल्यातील खोलेश्वर भागातील १४ वर्षीय मुलासह अन्वी मिर्झापूर येथील १३ वर्षीय बालकासह आणखी एक असे तिघे रेल्वे स्टेशन रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती आहेत. दोन दिवसांपासून ही बालके उपचार घेत अाहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या बालकांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली अाहेत. त्यांच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना प्लेटलेट्स रक्त चढवण्याचे काम सुरू आहे. मे महिन्यात नायगाव येथे अशाच प्रकारे बालिका डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आली होती.

हे उपाय करा : तापअसेपर्यंत आराम करा, ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत, निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा, रक्तस्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे, अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत.
असा होतो डेंग्यू
डेंग्यूचा प्रसार “एडीस एजिप्टाय” नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. यामध्ये प्रामुख्याने इमारतीच्या, सिमेंटच्या टाक्यांमधील, रांजणामधील पाणी तसेच प्लास्टिकच्या बादल्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स, कूलर आदींमध्ये साठलेल्या पाण्यावर या डासांची उत्पत्ती होते.
ही आहेत लक्षणे
{डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. { लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. { मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. { तीव्र स्वरूपाची अंगदुखी.

कोरडा दिवस पाळावा
^साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करा. पाण्याच्या साठ्यात जसे टाकी, हौदात गप्पी मासे सोडा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.'' डॉ.फारूख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका
बातम्या आणखी आहेत...