आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"रंगीत सावल्या\' सर्वाेत्कृष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुणे येथील कोलाज क्रिएशनच्या "रंगीत सावल्या' ही सर्वाेत्कृष्ट सांघिक एकांकिका ठरली. अभिनेते भरत जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
अनुष्का मोशन पिक्चर अॅँड एन्टरटेनमेंट प्रायोजित महावीर प्रतिष्ठानतर्फे सावेडीतील माउली सभागृहात आयोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, हिंदी चित्रपट लेखिका मनीषा कोरडे, परीक्षक अमित भंडारी, अभिनेत्री हेमांगी कवी, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आशा फिरोदिया, छाया फिरोदिया, हर्षल बोरा, स्वप्निल मुनोत, विक्रम फिरोदिया, राखी फिरोदिया आदी उपस्थित होते.

भरत जाधव म्हणाले, बऱ्याचदा कला, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था स्वप्रगतीला प्राधान्य देतात. नगरमध्ये मात्र गेल्या चार वर्षांत नव्या कलाकारांचा, तोही राज्यातील कलावंतांचा विचार केला जात आहे. या स्पर्धेस रंगकर्मींचा आशीर्वाद सतत लाभेल. तांबे म्हणाले, पूर्वीची राजाश्रयाची परंपरा फिरोदिया परिवाराने जोपासली अाहे. त्यामुळे उत्तम कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ निर्माण होतील.

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, परीक्षकांची परीक्षा पाहणारी नगरकरांना परिपूर्ण आनंद देणारी ही स्पर्धा ठरली. महाकरंडकाच्या परिवाराला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या उपक्रमास सर्वांची साथ लाभत असून जिथे कमी तिथे आम्ही या हेतूने सर्वच क्षेत्रात फिरोदिया परिवाराचे योगदान सतत राहील. पुढील वर्षात ही स्पर्धा नव्या रुपात साजरी करण्यात येईल.
परीक्षक अमित भंडारी हेमांगी कवी यांनी मनोगतात स्पर्धेतील बारकाव्यांविषयी सांगितले. सूत्रसंचालन महेश काळे प्रसाद बेडेकर यांनी केले, तर आभार पुष्कर तांबोळी यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : रंगीतसावल्या (कोलाज क्रिएशन, पुणे), द्वितीय - मित्तर (फोर्थ वॉल, मुंबई) तृतीय - दृष्टी (झिरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई ) चतुर्थ - पाझर (नाट्यवाडा, औरंगाबाद) उत्तेजनार्थ - भक्षक (डान्स डुपार्टमेंट, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
सर्वोत्कृष्टविनोदी एकांकिका - संगीतबायकोची मैत्रीण (मोरया, पुणे) सर्वोत्कृष्ट एकांकिका (अहमदनगर) - ड्रायव्हर (निर्मिती रंगमंच, अहमदनगर)

सर्वोत्तम दिग्दर्शन : प्रथमक्रमांक रवींद्र सातपुते (रंगीत सावल्या - कोलाज क्रिएशन) सर्वोत्तम दिग्दर्शन - द्वितीय क्रमांक - ओंकार जयवंत (मित्तर - फोर्थ वॉल, मुंबई) सर्वोत्तम दिग्दर्शन - तृतीय क्रमांक - अनिकेत पाटील (दृष्टी - झीरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई) सर्वोत्तम दिग्दर्शन - उत्तेजनार्थ - प्रवीण पाटेकर (पाझर - नाट्यवाडा, औरंगाबाद) सर्वोत्तम दिग्दर्शन - उत्तेजनार्थ - रावबा गजमल (भक्षक - औरंगाबाद)

सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम - नितीनसावळे (तो पाऊस आणि टाफेटा - अश्व थिएटर, मुंबई) सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय - रावबा गजमल (भक्षक, औरंगाबाद) सर्वोत्कृष्ट अभिनेता तृतीय - संजय जामखंडी (दृष्टी - झीरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई) सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ - साहिल जाधव (प्रती गांधी - व्यक्ती, पुणे) सर्वोत्कृष्ट अभिनेता उत्तेजनार्थ - प्रशांत गिते (पाझर - नाट्यवाडा, औरंगाबाद)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रथम- सोनाली मगर (सेल्फी - अभिनय, कल्याण) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय-अश्विनी जोशी (दृष्टी - झीरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय क्रमांक - पूजा कांबळे (मित्तर - फोर्थ वॉल, मुंबई) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तृतीय क्रमांक - मोनिका बनकर (ड्रायव्हर - निर्मिती रंगमंच, अहमदनगर) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ - लीना तांडावी (मांजा - जळगाव) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ - तेजश्री शेलेदार (प्रती गांधी - व्यक्ती, पुणे)

सर्वोत्कृष्ट सह-अभिनेता -हेमंत शिर्के (फोटू - मराठवाडा मित्रमंडळ, पुणे ) सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री - कल्याणी साखळूणकर (मित्तर - फोर्थ वॉल, मुंबई)
सर्वोत्कृष्टविनोदी कलाकार : प्रथमक्रमांक - अक्षय जोशी (संगीत बायकोची मैत्रीण - मोरया) सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार द्वितीय क्रमांक - अनिकेत कदम (पिकनिक -अनुभूती,)
प्रकाशयोजना : प्रथमक्रमांक - राजेश शिंदे (तो पाऊस आणि टाफेटा - अश्व थिएटर, मुंबई) द्वितीय क्रमांक - राजेश शिंदे (दृष्टी - झीरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई ) तृतीय क्रमांक - रवींद्र सातपुते, गौरव (रंगीत सावल्या - कोलाज क्रिएशन, पुणे)

संगीत प्रथम : क्रमांक- आनंद ओक (अफू - स्पंदन, नाशिक) संगीत द्वितीय क्रमांक - प्रतीक केळकर (रंगीत सावल्या - कोलाज क्रिएशन, पुणे) संगीत तृतीय क्रमांक - संदेश पवार, सुशील भालेराव (पिकनिक -अनुभूती, मुंबई )

नेपथ्य: प्रथम क्रमांक - जयंत गेले (रंगीत सावल्या - कोलाज क्रिएशन, पुणे) नेपथ्य द्वितीय क्रमांक - सुयश झुंजुर्ळे ( प्रतिगंधी - व्यक्ती, पुणे) नेपथ्य तृतीय क्रमांक - सागर पेंढारी (दृष्टी - झीरो बजेट प्रॉडक्शन, मुंबई )

रंगभूषा,प्रथम क्रमांक- मित्तर, रंगभूषा द्वितीय क्रमांक - असलम शेख (भक्षक) वेशभूषा प्रथम - नेहा ताठे, शिवानी वाडेकर (रंगीत सावल्या - कोलाज क्रिएशन) वेशभूषा द्वितीय - मुखवटे - मैत्री कलामंच, मुंबई
लेखन: प्रथम- रवींद्र सातपुते (रंगीत सावल्या - कोलाज क्रिएशन, पुणे) द्वितीय - प्रवीण पाटेकर (पाझर - नाट्यवाडा, औरंगाबाद)

सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कार "रंगीत सावल्या' या एकांकिकेस अभिनेता भरत जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. समवेत सत्यजित तांबे, चित्रपट लेखिका मनीषा कोरडे, परीक्षक अमित भंडारी, अभिनेत्री हेमांगी कवी, नरेंद्र फिरोदिया, आशा फिरोदिया. छाया: उदय जोशी