आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींचा पोलिस घेताहेत शोध , महामंडळाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक,अटकपूर्व जामिनासाठी केले अर्ज दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात कार्यरत असलेल्या चालकांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन महामंडळाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक, एसटीचे तत्कालीन अकोला विभाग नियंत्रक, औरंगाबादचे कामगार अधिकारी मानसेवी डॉक्टरांसह ३६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी अटकेच्या भीतीने फरार झाले आहेत. आरोपींच्या वतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शनिवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.
अकोला विभागातील कार्यरत चालकांना रंगअंधत्वाचा (कलर ब्लाइंडनेस) आजार दाखवून त्यांना बनावट दस्तऐवजाद्वारे सुरक्षा रक्षकपदी नियुक्ती दिली होती. यामध्ये एसटीचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टरांनी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन महामंडळाच्या डोळ्यात धूळ फेकली होती संगनमताने बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर या २६ चालकांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यांना राज्य सुरक्षा रक्षक पदावर राज्य परिवहन विभागाने नियुक्ती देऊन महामंडळाची फसवणूक केली होती.
या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल झाल्यानंतर खदान पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन विभाग नियंत्रक प्रशांत प्रभाकर भुसारी, औरंगाबादचे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत विठ्ठल गवारे, सहायक कर्मचारी वर्ग अधिकारी रमेश दत्तात्रय एडके, लिपिक प्रभाकर पंढरीनाथ गोपनारायण, रापमंचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. तारे, अकोला सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, सर्वोपचारच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशीमच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंत सिसोदिया, डॉ. व्ही. डी. क्षीरसागर यांच्यासह सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेले एम. टी. तायडे, एन. बी. चव्हाण, शालिग्राम मापारी, एस. व्ही. खुमकर, व्ही. बी. कोगदे, एस. बी. पवार, जी. ए. इंगोले, एम. यू. राठोड, एस. यू. टाले, एस. पी. बुटे, सी. ए. ठाकरे, आर. एन. रोडे, एस. बी. फड, एस. व्ही. गावंडे, एम. आर. पोफळे, डी. आर. चव्हाण, पी. के. जाधव, शेख महबूब, एस. एम. विटकरे, श्रीराम एस. मापारी, अब्दुल नईम, व्ही. एस. धनकर, व्ही. बी. तिवाले, डब्ल्यू. जे. आवारे, ए. आर. धनोकार, एस. एन. खानबरड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. हे सर्व आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर, लवकरच या आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.
बातम्या आणखी आहेत...